मुंबई दि.27 : सदुसष्टाव्या क्षयरोग निर्मूलन जनजागृती मोहिमेचे उद्घाटन राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत आज राजभवन येथे पार पडले. क्षयरोगाची राज्यातील सद्यस्थिती तसेच त्यावरील उपाय योजना याबद्दल राज्यपालांनी यावेळी माहिती घेतली.
भारतात क्षयरोगाचे प्रमाण जगात सर्वाधिक अधिक असून जागतिक आरोग्य संघटनेच्या 2015 सालच्या आकडेवारीनुसार जगातील 96 लक्ष टीबी रुग्णांच्या तुलनेत एकट्या भारतात 22 लक्ष रुग्ण आहेत. औषधोपचाराला प्रतिसाद न देणाऱ्या (ड्रग रेझिस्टन्ट ) क्षयरोगाचे प्रमाण देखील भारतात जास्त असून मुंबई शहरात झोपडपट्ट्यांमध्ये लोकसंख्येची घनता अधिक असल्यामुळे मल्टीड्रग रेझिस्टन्ट टीबीचे प्रमाण जास्त असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अँटी ट्युबरक्युलोसीस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश अंबे यांनी राज्यपालांना दिली. क्षयरोग निर्मूलन जनजागृती अभियानामुळे जनतेमध्ये क्षयरोगाबद्दल तसेच त्यावरील उपचाराबद्दल जनजागृती निर्माण होत असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले. क्षयरोग व त्यावरील उपाय योजना याबाबत समाजात जनजागृती व्हावी या हेतूने महाराष्ट्र राज्य अँटी टु ट्युबरक्युलोसीस असोसिएशनचे वतीने दरवर्षी ही मोहीम राबविली जाते. कार्यक्रमाला डॉ यतीन धोलाकिया, रेड क्रॉसच्या सचिव होमाई मोदी व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.