झोपड्या तोडण्याआधी पालिका, पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करामुंबई / अजेयकुमार जाधव / 18 Oct 2016 -
विधानसभा निवडणुकीदरम्यान कोंग्रेसकडून धोका मिळाल्याने येत्या मुंबई महापालिका निवडणुक समाजवादी पक्ष एकटा लढणार आहे. मुंबई महापालिकेच्या 115 ते 120 जागा समाजवादी पक्ष लढवणार असल्याची घोषणा महाराष्ट्र अध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी केली. मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत अबू आझमी बोलत होते.
सांप्रदायिक शक्तिना रोखण्यासाठी आम्ही कोंग्रेस सोबत निवडणुक लढवणार होतो परंतू निवडणुकीदरम्यान कोंग्रेसच्या संजय निरुपम यांच्या मुले शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही वाट बघितली. परंतू सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शेवटच्या दिवशी आम्हाला आमचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे लागले. यानंतरही आम्ही नारायण राणे याना आपला पाठिंबा दिला होता असे आझमी म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाचा परिणाम दिसणार नाही. एमआयएमला जनताच जागा दाखवेल असे आझमी यांनी सांगितले. मुंबई मधील 14 फूटावरील झोपड्या तोडण्या आधी इमारती मधे 51 हजाराहुन अधिक अनधिकृत बांधकामे आहेत ती पालिकेने तोडावी. झोपड्या तोडायच्या झाल्यास त्या झोपड्या ज्या पालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांमुले उभ्या राहिल्या त्यांच्यावर आधी कारवाई करावी, झोपडीधारकांकडून पालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले असल्याने ते पैसे व्यजासह झोपड़ी धारकाना परत करावे अशी मागणी आझमी यांनी केली.
राज्यात आणि महापालिकेत सत्तेत असूनही शिवसेना आणि भाजपामध्ये वाद सुरु आहे. एकमेकांविरोधात बोलण्यापेक्षा आणि आरोप करण्यापेक्षा स्वाभिमानाने सत्तेला लाथ मारून दोघांनी बाहेर पडावे असे आवाहन आझमी यांनी केले. मुस्लिम आरक्षणासाठी रणनिती आखली जात आहे. लवकरच मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलन व मोर्चे काढले जातील असा इशारा आझमी यांनी दिला आहे. यावेळी आझमी यांच्यासह पालिकेतील गटनेते रईस शेख व पक्षाचे प्रवक्ते अब्दुल कादिर चौधरी उपस्थित होते.