पालिका शालेतील शिक्षकांना बोनस न दिल्याने शिक्षण समिती सदस्याचे उपोषण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका शालेतील शिक्षकांना बोनस न दिल्याने शिक्षण समिती सदस्याचे उपोषण

Share This
मुंबई / प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेतील 1 लाख 25 हजार कर्मचाऱ्यांना 14 हजार 500 रूपये बोनस जाहिर केला असताना पालिका शाळामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र बोनस जाहिर न केल्याने शिक्षण समिती सदस्य शिवनाथ दराडे यांनी महापालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या 149 माध्यमिक शाळा असून 100 कायम विना अनुदानीत शाळा आहेत. 49 अनुदानीत शाळामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालिकेचे कर्मचारी आहेत. त्यांना पालिका कधी सानुग्रह अनुदान देते तर कधी देत नाही. पालिकेचे कर्मचारी असतानाही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात नाही. याबाबत पालिका प्रशासन कोणतेही कायदेशीर कारण देत नसल्याने शिक्षणमंत्री व सचिव यांच्याकडे संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सर्वाना समान न्याय द्यावा असे सूचित करण्यात आले होते.

पालिकेने 427 खाजगी अनुदानित शालेमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ते पालिकेचे कर्मचारी नसताना बोनस देते परंतू शिक्षणमंत्र्यांकड़े बैठकीत निर्णय होऊंनही शाळांमधील कायम असलेल्या 1500 कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आलेला नाही. याबाबत 9 वेळा पत्र देवूनही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला नसल्याने शिवनाथ दराडे यांनी गुरूवार 27 ऑक्टोबर पासून उपोषण सुरु केले आहे. पालिकेत शिवसेना भाजपाची सत्ता असून भाजपाच्या शिक्षण समिती सदस्याने उपोषण सुरु केल्याने सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिल्याची चर्चा पालिका मुख्यालयात आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages