Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईतील वाढत्या साथीच्या रोगावरून विरोधकांनी पालिका प्रशासनाला फैलावर घेतले.

मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत डेंग्यू, मलेरिया,चिकन गुनिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो, कावीळ इत्यादी साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून पालिका प्रशासन यावर आला घेण्यास अपयशी ठरत असलायचा आरोप विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी आज सभागृहात निवेदनाद्वारे केला. यावेळी सर्व विरोधकांनी प्रशासनाला फैलावर घेतले. मात्र पालिका प्रशासन उत्तम काम करीत असून विरोधक मात्र नाहक जनतेमध्ये घबराट पसरवीत असल्याचे सांगत प्रशासनाला पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचे वक्तव्य स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केल्याने सभागृहात काही काळ गोंधळ माजला.
डेंग्यू आणि मलेरियाचा आजार बळावत आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचा २४८ रुग्णांची तर सप्टेंबर महिन्यात केवळ २५ दिवसात २९६ रुग्णांची नोंद झाली असून, मलेरियाचे ७१७ रुग्ण, गॅस्ट्रोचे ५२३ आणि काविळीचे १०८ रुग्ण उपचार घेत आहेत. खाजगी दवाखाने आणि रुग्णालयामध्ये डेंग्यूच्या तापाने फणफणणारे हजारो रुग्ण उपचार घेत आहेत. खाजगी प्रयोगशाळांमधील अहवाल महानगरपालिकेकडे अनेकदा वेळेवर जात नाहीत, त्यामुळे अशा रुग्णाची नोंद देखील होत नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी साथीच्या रुग्णाचे प्रमाण अधिक असतांनाही प्रशासनाकडून रुग्णाची संख्या कमी दर्शिविणारी आकडेवारी सादर करून प्रशासन आपली पाठ थोपटून घेत आहे. या वेगवेगळ्या आजारांच्या वाढत्या रुग्णांमुळे मुंबईकरांनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन विध्यार्थी, नोकरदारवर्ग, चित्रपटसृष्टीतील कलाकार या सर्वांनीच त्याचा धसका घेतला आहे. झोपडपट्ट्यांपासून ते उच्चभृ सनदी अधिकारी आणि बॉलीवूडकरांच्या आलिशान घरांपर्यंत डेंग्यूचा फैलाव झालेली आहे. महानगरपालिका तसेच खाजगी रुग्णायलमधील वॉर्ड रुग्णांनी भरून गेले आहेत. अनेक रुग्णांना बेड अभावी जमिनीवर बिछान्यांचे बेड करून उपचार दिले जात आहेत. आता पर्यंत डेंग्यूमुळे ३ तर लेप्टोमळे ७ जणांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. 

डेंग्यू तसेच मलेरियास प्रतिबंध करण्यास आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरत आहे. डेंग्यूच्या थैमानापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकरांच्या घरी डेंग्यूची डास सापडल्यास प्रशासनातर्फे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. पण आश्चर्य म्हणजे त्यातून उच्चभृणां सूट दिली जात आहे. महानगर पालिका प्रशासन मुंबई शहरात डेंग्यूसह विविध साथींच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यास सपशेल अपयशी ठरत आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. सत्ताधारी शिवसेना- भाजप युतीमध्ये उदघाटन मानापमान नाट्य चालू असल्यामुळे मुंबईकांच्या आरोग्याचा पूर्णपणे विसर पडला आहे. 

या विषयावर चर्चा करताना राष्ट्रवादीचे गट नेते धनंजय पिसाळ यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. आमचे मुंबई अध्यक्ष सचिन पाहिलं यांच्या नेतृत्वा खाली २० सप्टेंबरला डेंग्यूबाबत निवेदन देऊन उपाय योजना करण्याचे सुचविले होते. मात्र १० दिवसांनंतरही मुंबईतील परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. पालिका प्रशासनाकडून डेंग्यू संदर्भात दिली जाणारी रुग्णाची आकडेवारी केवळ पालिका रुग्णालयातील असून मुंबईतील ७० टक्के डेंग्यूचे रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची आकडेवारी का दिली जात नाही असा सवाल पिसाळ यांनी केला. सायन रुग्णालयाचे डीन डॉ. मर्चन्ट हे मुंबईत डेंग्यूने थैमान घातले असताना विदेश दौऱ्यावर आहेत आयुक्त या संदर्भात काय स्पष्टीकरण करणार असेही त्यांनी विचारले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom