Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्‍सवर महाराजांचे जगाला हेवा वाटेल असे स्‍मारक उभे करणार - सुरेश प्रभू

मुंबई, दि. 30 - मुंबईतील उनपगरीय रेल्‍वेचा दर्जा उंचावण्‍यासोबतच छत्रपती ि‍शवाजी महाराज टर्मिनन्‍सवर छत्रपती शिवाजी महाराजांचे जगाला हेवा वाटेल असे स्‍मारक उभे करणार असल्‍याची घोषणा रेल्‍वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केली. तर मी मुंबई अभियान म्‍हणजे स्‍वाभिमान आणि शपथ आहे असे मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी जाहीर केले.
मुंबई भाजपातर्फे सुरू करण्‍यात आलेल्‍या मी मुंबई या अभियानाची सुरूवात आज दादर येथील वैद्य सभागृहात झालेल्‍या पदाधिकारी मेळाव्‍यात करण्‍यात आली. यावेळी रेल्‍वे मंत्री सुरेश प्रभू यांचा जाहीर सत्‍कार करण्‍यात आला. मी मुंबई अभियानाची सुरूवात रेल्‍वेच्‍या कामांपासून करण्‍यात आली असून भाजपा सरकारच्‍या काळात सुरू झालेल्‍या मुंबईतील उपनगरीय रेल्‍वेच्‍या कामांची माहिती देणारी पुस्‍तीका, माहितीपत्राचे प्रकाशन यावेळी सुरेश प्रभूयांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तर रेल्‍वे वरील खास फिल्‍मही यावेळी सादर करण्‍यात आली. यापुढे अशा विविध विषयांवर अभियानामार्फत केंद्र आणि राज्‍य सरकारने केलेल्‍या कामांची माहिती घेउन भाजपा कार्यकर्ते घराघरापर्यंत पोहचणार आहेत. तर पहिला टप्‍पा 14 ते 21 आक्‍टोबर दरम्‍यान रेल्‍वेच्‍या कामांची माहिती घेऊन भाजपा कार्यकर्ते मुंबईतील रेल्‍वे स्‍टेशनवर प्रवाशांची संवाद साधणार आहेत.

यावेळी अभियानाबाबत माहिती देताना आमदार अॅड आशिष शेलार म्‍हणाले की हे अभियान म्‍हणजे एक शपथ आहे. एक स्‍वाभिमान आहे. सेवेची संधी आहे. तर मी मुंबई अभियान म्‍हणजे मुंबईकरांवर अन्‍याय करणाऱयांचा पराभव करण्‍याची शपथ आहे, असे जाहीर करताच सभागृहात टाळयांचा कडकडाट झाल.

यावेळी सुरेश प्रभू म्‍हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचा ध्‍यास घेऊन काम करण्‍यास सुरूवात केली आहे. त्‍यामुळे मुंबईकरांसाठी एक संधी आहे. आता मुंबईचा विकास करायचा असेल तर मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवा, असे आवाहन त्‍यांनी यावेळी करताच सभागृह पुन्‍हा टाळयांनी भरून गेले.

भारतीय रेल्‍वेने केलेल्‍या कामांची माहिती देताना त्‍यांनी रेल्‍वेच्‍या अनेक उपक्रमांचा उहापोह केला. रेल्‍वेमध्‍ये यापुर्वी गुंतवणून केली जात नव्‍हतील मात्र आपण रेल्‍वे मंत्री झाल्‍यानंतर 1 लाख 50 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक विमा कंपनीने करण्‍याचा करार केला असून राज्‍यांची गुंतवणूक ही घेण्‍यात येणार आहे. यामध्‍ये महाराष्‍ट्राने सर्वात आधी 10 हजार कोटींची गुंतवणुक करण्‍याचा मानस व्‍यक्‍त केला आहे त्‍यांतर देशातील 16 राज्‍य पुढे आली आहेत.

मुंबईसाठी एमयुटीपी 3 ला मंजूरी देण्‍यात आली असून मुंबईत एलिव्‍हेटेड रेल्‍वे कॉरिडॉरचा पायाभरणी समारंभ लवकरच करण्‍यात येईल असेही त्‍यांनी जाहीर केले. तर सध्‍या असणारा रेल्‍वेवरील एकाच वेळचा ताण कमी करण्‍यासाठी कामाच्‍या वेळा बदण्‍याची संकल्‍पना आपण मांडली असून राईट या संस्‍थेने याबाबत अभ्‍यास करून आपला अहवाल सादर केला आहे. या शिवाय उत्‍तर प्रदेशसाठी नव्‍या गाडया, कोकणातील रेल्‍वे स्‍थानकांचा विकास, याचाही सविस्‍तर उहापोह त्‍यांनी यावेळी केला. देशभर रेल्‍वेचे जाळे सक्षम करणयासाठी करण्‍यात येत असलेल्‍या कामांची माहिती त्‍यांनी दिली.

या कार्यक्रमाला आमदार सरदार तारासिंग, भाई गिरकर, मनिषा चौधरी, योगेश सागर, आर. एन. सिंह, राज पुरोहित, माजी आमदार मधू चव्‍हाण, संघटन मंत्री सुनिल कर्जतकर, सुमंत घैसास, अमरजित मिश्र, विनायक कामत आदी उपस्थित होते तर सुनिल राणे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले

Top Post Ad

Below Post Ad

Voter Information & Services

Ads Bottom