विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १९ नोव्हेंबरला निवडणूक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2016

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १९ नोव्हेंबरला निवडणूक

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी येत्या १९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निकाल २२ नोव्हेंबरला जाहीर होईल. जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे आणि भंडारा-गोंदिया. या ठिकाणचे विद्यमान आमदार अनुक्रमे गुरुमुख जगवानी (भाजपा) प्रभाकर घार्गे (राष्ट्रवादी), अमर राजूरकर (काँग्रेस), संदीप बाजोरिया (राष्ट्रवादी) अनिल भोसले (राष्ट्रवादी), राजेंद्र जैन (राष्ट्रवादी) यांचा कार्यकाळ ५ डिसेंबरला संपणार आहे. १९ तारखेच्या निवडणुकीसाठी उमेदवरी अर्ज २ नोव्हेंबरपर्यंत भरता येतील. ३ नोव्हेंबरला अर्जाची छाननी होईल. ५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १९ तारखेला सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होईल. 

Post Bottom Ad