मेट्रोच्या कामांमुळे होणारे बेस्टच्या नुकसानीची भरपाई एमएमआरडीए कडून वसूल करावी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2016

मेट्रोच्या कामांमुळे होणारे बेस्टच्या नुकसानीची भरपाई एमएमआरडीए कडून वसूल करावी

मुंबई .13 ऑक्टोबर - मुंबई शहरात एम एम आर डी ए तर्फे ज्या ज्या ठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे सुरु आहेत त्या त्या ठिकाणची बेस्ट बस सेवा विस्कळीत होते , त्यानुसार एम एम आर डी ए ने ज्या प्रमाणे वाहतूक पोलिसांना २५ कोटीं दिले आहे त्याचप्रमाणे बेस्ट चे नुकसान टाळण्यासाठी बेस्ट ला ठराविक रक्कम द्यावी अशी मागणी बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी ठरावाच्या सूचना केली आहे .
मुबईतील वाहतुकीची जटिल समस्या सोडविण्यासाठी एम एम आर डी ए तर्फे मुंबई शहरात अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वे ची कामे हाती घेण्यात आली आहेत .त्यात डी एन नगर ते दहिसर पश्चिम मेट्रो व अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व या मेट्रो प्रकल्पना सुरुवात झाली आहे . व ईतर ठिकाणी हि लवकरच सुरु होणार आहेत .या मेट्रो च्या बांधकामांमुळे शहरात व उपनगरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बेस्ट उपक्रमाच्या बस प्रवर्तनावर देखील परिणाम झाला आहे. यापूर्वी हि वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो चे बांधकाम होताना त्या भागातील बसगड्यांच्या प्रवर्तनामध्ये फेरफार केल्यामुळे बेस्ट चे प्रचंड नुकसान झाले होते . व याची नुकसान भरपाईची मागणी करून देखील वसुली करण्यात आली नव्हती . म्हणून बेस्ट उपक्रमाचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी अगोदरच एम एम आर डी ए कडून ठोस रक्कम घेण्याची मागणी सुनील गणाचार्य यांनी केली आहे .

वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी एम एम आर डी ए प्राधिकारणांकडून मुंबई पोलिसांना 25 कोटी रुपयांची साधनसामग्री व मनुष्यबळ वाहतूक पोलिसांना देण्यात येणार आहे . त्याच धर्तीवर वाहतूक कोंडीमुळे बेस्ट उपक्रमाच्या बस प्रवर्तनामुळे होणारे संभाव्य नुकसान विचारात घेऊन व ह्याचे संपूर्ण परीक्षण करून एम एम आर डी ए कडे आर्थिक मागणी करावी अशी सूचना हि सुनील गणाचार्य यांनी केली आहे .

Post Bottom Ad