बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बोनस दया - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बोनस दया

Share This
मुंबई / प्रतिनिधी - बेस्ट कर्मचाऱ्यांना गेले 4 वर्षे बोनस देण्यात आलेला नाही. यामुले यावर्षी पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस दयावा अशी मागणी बेस्ट समितीमध्ये करण्यात आली. तसा प्रस्तावही समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांना सलग 3 वर्षे बोनस देण्यात आलेला नाही. सन 2015 मधे 5 हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्यात आले. यावर्षी तरी बोनस द्यावा अशी मागणी सुनिल गणाचार्य यांनी ठरावाद्वारे केली. बेस्टची आर्थिक परिस्थिती हालाकिची असल्याने पालिकेकडून 1600 करोड़ रुपये कर्ज घेतले आहे. त्यावर पालिका 10 टक्के व्याज आकारत आहे. पालिकेने 10 ऐवजी 7 टक्के व्याज घेतल्यास बेस्टकड़े काही रक्कम शिल्लक राहु शकते यामधून बोनस आणि इतर खर्च करता येणे शक्य असल्याचे गणाचार्य म्हणाले.

बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळालाच पाहिजे अशी भूमिका रवि राजा, शिवजी सिंह, संदेश कोंडविलकर यांनी घेतली. सुहास सामंत यांनी वेळ पडल्यास वर्षा किंवा मातोश्रीवर मध्यस्थी करा पण या वर्षी कर्मचाऱ्यांना बोनस दया, बोनससाठी बेस्ट बंद करण्याची वेळ आणू नका असे आवाहन केले. महापौरांची सर्व युनियननी भेट घेतली असता त्यानीही बोनस देण्यास सहमती दर्शवल्याचे सामंत यांनी सांगितले.

परंतू महाव्यवस्थापक जगदीश पाटिल यांनी बेस्टची आर्थिक परिस्थिती खराब आहे.टाटा कडून जी विज घेतली जाते त्याचे पेमेंट उशिरा केले जात असल्याने दंड आकारला जात आहे. शासनाची देणी वेळेवर द्यावी लागत आहेत, टीडीएलआर रद्द झाल्याने बेस्टला 650 कोटी रुपये कमी मिळणार आहेत. अश्या परिस्थितीत बोनस देने शक्य नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान बेस्टचे कर्मचारी पालिकेचे कर्मचारी आहेत. पालिकेने त्यांची जबाबदारी घेवून पालिका कर्मचाऱ्यां इतकाच बोनस द्यायला हवा. महापौरांकड़े सर्व युनियनने मागणी केल्यावर महापौरानी बोनस देण्यासाठी दोन दिवसात बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे असे बेस्ट कर्मचारी युनियनचे शशांक राव यांनी सांगितले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages