बीआरएसपीचे राष्ट्रीय विद्यार्थी संमेलन नागपुरात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बीआरएसपीचे राष्ट्रीय विद्यार्थी संमेलन नागपुरात

Share This
मुंबई | प्रतिनिधी - कांशिरामजी स्मृतीदिन आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या (बीआरएसपी) वर्धापन दिनाचे ओचित्य साधून नागपूर येथील बैद्यनाथ चौक, उंटखाना मैदानात आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय विद्यार्थी संमेलन ९ आणि १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.
देशभरातील बहुजन विद्यार्थ्यांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, बेराजगारी, भविष्यातील वाटचाल अशा विविध विषयांवर राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात येत आहे आणि बहुजन आंबेडकराईट विद्यार्थ्यांचा राजकीय व्यवस्थेत समावेश असावा, या करीता ‘बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा‘ ची स्थापना तिथेच करण्यात येणार आहे आणि राष्ट्रीय स्तरावर आघाडी निर्माण केली जाणार आहे. दिल्ली, हैदराबाद, महाराष्ट्र, तेलंगाना राज्यांतील सर्व युनिव्हर्सिटी विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याचे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक -अध्यक्ष अँड. डॉ. (प्रा) सुरेश माने यांनी सांगितले.

फुले, शाहु, आंबेडकरी, कांशीरामजी या विचारधारेला जर पुढे टिकवायचे आहे तर युवकांनी ही जबाबदारी कर्तव्य समजून आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे, म्हणुन आपण ही त्या ठिकाणी सामील झालो पाहीजे या भावनेने सर्वांनी हजर राहावे, असे पार्टीचे प्रा.जयमंगल धनराज यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages