कुणबी युवा मेळावा व ओबीसी आरक्षण बचाव परिषद युवा जल्लोषाने संपन्न. - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुणबी युवा मेळावा व ओबीसी आरक्षण बचाव परिषद युवा जल्लोषाने संपन्न.

Share This
मुंबई - कोकणातील कुणबी समाज आपले ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आक्रमक झाला आहे. आपल्या वाट्यात तो कुणालाही वाटेकरी करण्यास कदापि तयार नाही. मराठयांचे कुणबी म्हणून अतिक्रमण रोखण्यास युवा वर्ग सज्ज झाला आहे. हा विषय चांगलाच रंगत होत चालला आहे. कोकणातील कुणबी समाजातील युवक वर्ग मोठ्या संख्येने संघटीत होत आहे. भारतीय संविधान, आरक्षण व राजकीय स्थिती याबाबत तरुणांना प्रबोधित करण्यासाठी युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा महाड पोलादपूर संलग्न- कुणबी युवक व महिला मंडळ यांनी २ ऑक्टोबर २०१६ रोजी मुंबईत मराठी साहित्य संघ हॉल गिरगाव, मुंबई येथे युवाध्यक्ष समीर रेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला. भारताचे संविधान आम्हाला आजपर्यंत कसे समजले नाही. कि कुणी समजावून दिले नाही. काय आहे त्या संविधानात दडलेले..कदाचित आमचे अधिकार तर नाहीत ना, देश स्वतंत्र होवून ६९ वर्ष झालीत तरीही कुणबी ओबीसी समाज आहे तेथेच आहे. काय आहे आमच्या अधोगतीचे कारण. हे जाणून घेणे गरजेचे आहे. आणि जो पर्यंत संविधान जाणून घेत नाही तो पर्यंत आमचे प्रश्न सुटू शकत नाहीत. जो पर्यंत भारताचे संविधान आमच्या युवकांना समजत नाही तोपर्यंत आपले भले होणे नाही. असे उद्गार युवाध्यक्ष समीर रेवाळे यांनी काढले.

मेळाव्याला कोकणातील अनेक मान्यवर तसेच संघाध्यक्ष भुषण बरे, मोहन गोरे, मेळाव्याचे प्रमुख वक्ते समाजसेवक मा. मारुती (काका) जोशी, संघ सहचिटणीस कृष्णा सुर्वे , गणेश मौले, उद्योजक कृष्णा कोबनाक, रायगड जिल्हा कुणबी समन्वय समिती उपाध्यक्ष / शाखा निरीक्षक.अशोक करंजे, समिती सदस्य अरविंद ठमके, कुणबी युवा मुंबई युवाध्यक्ष माधव कांबळे, समाजोन्नती मंडळ महाड पोलादपूर कोषाध्यक्ष संदेश गोठल, शाखाध्यक्ष अनंत गवळकर, जेष्ठ समाजसेवक सिद्धार्थभाऊ गमरे, राजापुर संदीप राडये , विजय भोस्तेकर तसेच सावित्री नदी पुल दुर्घटना प्रसंगी उल्लेखनीय कामगिरी केलेले महाड तालुक्याचे जलतरणपट्टू संतोष मोरे, युवा समाजसेवक प्रफुल्ल धोंडगे, यांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्याला तालुक्यातील हजारो युवक-युवती उपस्थित होते. कोकणातील तरुणांना संघटीत करून पुढील काळात राजकीय व सामाजिक स्थितीवर लवकरच लोक जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ह्या मेळावा ठेवण्यात आला होता.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages