ज्येष्ठ नगरसेवकांची प्रभागांसाठी चाचपणी सुरू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ज्येष्ठ नगरसेवकांची प्रभागांसाठी चाचपणी सुरू

Share This
मुंबई - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आरक्षण सोडत सोमवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांमध्ये नव्या प्रभाग रचेनेचे आराखडे मिळविण्याच्या धडपड सुरू झाल्या आहेत. त्याच पालिकेतील अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचे प्रभाग राखीव झाल्याने त्यांनी आजुबाजूच्या प्रभागात चाचपणी सुरू केली आहे.

साधारणतः 54 ते 55 हजार लोकांमागे एक नगरसेवक, अशा सूत्रानुसार प्रभागांची रचना करण्यात आली. रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूला पूर्व आणि पश्‍चिम विभागात हे प्रभाग विस्तारणार आहे. नव्या रचनेत रेल्वेमार्गांमुळे प्रभाग छेदले जाणार नाहीत, याबाबतची काळजी निवडणुक आयागाने जरी घेतली असली तरी एक प्रभागाचे दोन- तीन भाग केल्याने नव्या प्रभागांबाबत सध्या तरी इच्छुकांमध्ये गोंधळ उडाला आहे. त्यामुळे आपला विभाग कोणत्या प्रभागात मोडत आहे, याचा कानोसा घेण्यासाठी इच्छुकांना कसरत करावी लागत आहेत. प्रभागांच्या फेररचनेमुळे एका प्रभागाचे दोन प्रभागात विभाजन झाल्याने दोन्ही प्रभागातील मतदारांपर्यंत पोहण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. त्यात आरक्षण आणि प्रभाग रचनेमुळे एकाच प्रभागात एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांच्या मतदारांची विभागणी झाल्याने यामुळे तिकिट वाटपाच्यावेळी पक्षनेत्या समोर पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे मोठ्या बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांचा सध्याचा प्रभाग जरी राखीव झाला असला तरी त्यांनी यापुर्वी निवडणुक लढविलेला व सध्याच्या नवीन प्रभागाप्रमाणे ६८ क्रमांचा प्रभाग खुला झाल्यामुळे तसेच जुना प्रभाग क्रमांक ६०मध्ये समाविष्ट झाल्याने या दोन्ही प्रभागातून निवडणुक लढविण्याची संधी आहे. तर राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांचा ११७ क्रमांकाचा प्रभाग महिलांकरिता आरक्षित झाला असला तरी भांडूप पश्चिम कडील प्रभाग क्रमांक ११४ व ११५ हे प्रभाग सर्वसाधारण पुरुषांकरिता असल्याने आणि या प्रभागातून २००७ मध्ये पिसाळ हे नगरसेवक पदी निवडून आल्याने त्यांना या दोन्ही प्रभागातून निवडणुकीसाठी संधी प्राप्त होणार आहे. तर प्रभाग क्रमांक १११ हा विभाग महिला राखीव झाल्याने त्यांच्याकडून त्यांच्या पत्नीला निवडणुक लढविणे शक्य होईल. त्याच प्रमाणे शिवसेनेचे जुने नगरसेवक सुभाष सांवत, विश्वनाथ म्हाडेश्वर, मनोहर पांचाळ यांचे प्रभाग खुले झाल्याने त्यांच्या पत्नींच्या जागी त्यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. तर माजी आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल यांचा प्रभाग महिला खुला वर्ग झाल्याने त्यांना पुन्हा पालिकेत येण्याची संधी मिळणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages