प्रभाग फेररचनेवर राजकीय पक्षांना संशय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रभाग फेररचनेवर राजकीय पक्षांना संशय

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमधे बदल झाल्याने 80 टक्के नगरसेवकांचे प्रभाग बदलल्याने या प्रभाग रचनेवर संशय व्यक्त करून नाराजी व्यक्त केली आहे. मात्र संशय आणि नाराजी व्यक्त करताना कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता याबाबत आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील असे विविध पक्षाच्या गट नेत्यांनी म्हटले आहे.

कोंग्रेसचे विरोधी पक्ष नेते प्रवीण छेड़ा यांचा प्रभाग दोन प्रभागामध्ये विभागला आहे तसेच महिलांसाठी आरक्षित झाला आहे. आमचे नेते, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्याकडून मिळालेल्या माहितीनूसार एका राजकीय पक्षाला फायदेशीर असलेली प्रभाग फेररचना रचना करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी याबाबत बोलताना आमचा पक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी चांगल्या प्रकारचे काम केले आहे. यामुले प्रभाग रचना किंवा आरक्षण याचा आमच्या पक्षावर कोणताही फरक पडणार नाही असे सांगितले आहे.

मनसेचे गटनेते संदिप देशपांडे यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यांनी प्रभाग रचनेबाबत बोलताना माझ्या निरिक्षणानुसार प्रभाग आरक्षण सोडत योग्य प्रकारे झाली आहे. मात्र प्रभाग रचनेमध्ये ख़ास करून उपनगरात गुजराती आणि उत्तर भारतीयांचे एकगठठा मतदार असलेले प्रभाग बनवण्यात आलेले आहेत. त्याच वेळी मराठी मतदार असलेले प्रभागांची विभागणी करण्यात आलेली आहे. असे मत संदिप देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते धनंजय पिसाळ यांचा प्रभाग महिला आरक्षित झाला आहे. त्यांनी प्रभाग रचनेबाबत बोलताना प्रभाग रचना करताना जाणून बुजून स्वताच्या फायद्यासाठी करण्यात आल्याचा संशय आहे. असे काहीही करण्याचा प्रयत्न झाला असेल तरी आमच्या कामाची दखल घेवुन प्रजा संस्थेने पक्षाला पहिला क्रमांक दिला आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरु असे पिसाळ यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages