मुंबई / प्रतिनिधी - मनसेचे पालिकेचे गटनेते संदिप देशपांडे व नगरसेवक संतोष धुरी यांनी अभियंत्याची मानहानी केल्याप्रकरणी सुरु केलेले आंदोलन पालिका आणि मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर मागे घेत असल्याची माहिती अभियंता संयुक्त कृती समितीचे सुखदेव काशिद व साईनाथ राजाध्यक्ष यांनी दिली.
मुंबईमध्ये रस्त्यावर खड्डे पडल्याने मुख्य अभियंता संजय दराडे याना खड्ड्यात उभे करून खड्ड्या ना मी जबाबदार असल्याचे फलक हातात दिले होते. यावरून पालिका अभियंत्यांनी आंदोलन सुरु केले होते. याप्रकरणी गुन्हा नोंद्वून कारवाई होत नाही तो पर्यंत कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. तसेच शुक्रावारी कामबंद आंदोलना दरम्यान अतिरिक्त आयुक्त आणि मुख्यमंत्री यांची भेट घेवून दोन्ही नगरसेवकांवर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे राजाध्यक्ष यांनी सांगितले.
संदिप देशपांडे यांनी आता पर्यंत केलेला हां तीसरा प्रकार आहे. यामुळे त्यांचे व धुरी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकड़े पाठवावा, कर्मचारी अधिकारी, अभियंता याना मारहाण होत असल्याने डॉक्टरांप्रमाणे संरक्षण मिळावे असा कायदा करावा, अभियंत्यांची रिक्त पदे त्वरित भारावीत, स्ट्याक कमिटीच्या शिफाराशीची अमलबजावणी करावी अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्याचे काशिद यांनी सांगितले. येत्या गुरूवार पर्यंत देशपांडे व धुरी यांच्यावर कारवाई न झाल्यास गुरुवारी पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असा इशारा काशिद यांनी दिला आहे.

No comments:
Post a Comment