शाहिरांविरोधातील खटले मागे घेण्यासाठी उपोषण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शाहिरांविरोधातील खटले मागे घेण्यासाठी उपोषण

Share This


मुंबई / प्रतिनिधी
आंबेडकरी चळवळीतील शाहिर सचिन माळी, शितल साठे, सागर गोखले, रमेश गायचोर यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने खटले दाखल करण्यात आले आहेत. हे खटले त्वरित मागे घ्यावे यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात ब्लू टायगर संघटनेच्या वतीने सोमवारी (17 ऑक्टोबर) एक दिवसीय उपोषण करण्यात आले.

शाहिर सचिन माळी, शितल साठे, सागर गोखले, रमेश गायचोर 2011 पासून तुरुंगात आहेत. त्यांना जामिन मिळू नए म्हणून पोलिस यंत्रणा जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत आहेत. हे कलाकार पुरोगामी शाहिरांचा वारसा चालवत समाजात जनजागृती व लोकप्रभोधनाचे काम करत आहेत. या कलावंताना नक्षलवादी ठरवून खटले दाखल करण्यात आले आहेत. या कलावंतावरील खटले मागे घ्यावेत यासाठी ब्लू टायगरचे अध्यक्ष विलास रुपवते यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले. यावेळी माजी न्यायमूर्ती डॉ. डी. के. सोनावने, रामाताई अहिरे, दिपक गायकवाड, यांच्यासह विविध पक्ष संघटना, वकील, डॉक्टर, समाज सेवक सहभागी झाले होते. या उपोषणा दरम्यान राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसकर यांची उपोषणकर्त्यानी भेट घेतली असता याप्रकरणी तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश केसकर यांनी दिल्याची माहिती रुपवते यांनी दिली आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages