एट्रोसिटी कायदा व स्वतंत्र मतदार संघासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 October 2016

एट्रोसिटी कायदा व स्वतंत्र मतदार संघासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषण



मुंबई / प्रतिनिधी
एट्रोसिटी कायद्याची कड़क अमलबजावणी करावी व अनुसूचित जाती जमतीसाठी स्वतंत्र मतदार संघ घोषित करावे यासाठी डॉ. सुरेश गवई यांनी मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट होणार नाही तो पर्यंत बेमुदत उपोषण सुरुच राहणार असल्याचे गवई यांनी सांगितले.


भारतीय निवडणुक आयोगाने कायद्यात बदल करून अनुसूचित जाती जमतीसाठी स्वतंत्र मतदार संघ घोषित करावे. ब्रिटिश सरकारने 17 ऑगस्ट 1932 ला दिलेला प्रस्ताव मंजूर करावा. एट्रोसिटी कायदा मजबूत करावा, कायद्याची कड़क अमलबजावणी करावी, एट्रोसिटीसाठी प्रत्तेक जिल्ह्यात न्यायालये स्थापन करावीत, कायद्याची अमलबजावणी न करणाऱ्यावर कारवाई करावी, एट्रोसिटी कायद्याचा चुकीचा वापर करणाऱ्यावर कारवाई करावी, कायद्याची अमलबजावणी आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यावर सोपवावी, एट्रोसिटी प्रकरणी त्वरित एफआयआर नोंद करावा, एट्रोसिटीची तक्रार दाखल करणाऱ्याना विशेष पोलिस सरक्षण द्यावे इत्यादी 19 मागण्यासाठी डॉ. सुरेश गवई यांनी सोमवार 17 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

Post Bottom Ad