होंडा 2व्हीलर्सने सणासुदीच्या काळात नोंदवला नवा विक्रम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2016

होंडा 2व्हीलर्सने सणासुदीच्या काळात नोंदवला नवा विक्रम

नवी दिल्ली, नोव्हेंबर 07, 2016 : होंडाने प्रथमच 2016 मधील सणासुदीच्या काळात 10 लाख रिटेल विक्रीचा टप्पा पार करून नवा विक्रीम प्रस्थापित केला आहे!

सणासुदीच्या निमित्ताने होंडाच्या मौल्यवान ग्राहकांचे आभार मानत, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी केटा मुरामात्सु यांनी सांगितले, “या सणासुदीच्या काळातील प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी, आम्ही अंदाजे सहा महिन्यांपूर्वी कामास सुरुवात केली. या वर्षी आम्ही महिन्यागणिक सातत्याने वाढ साध्य केली आहे. एक ट्रेंड म्हणून, ऑटोमॅटिक स्कूटर्स दुचाकी क्षेत्राच्या वाढीला चालना देत आहेत आणि गुजरातमधील चौथा प्रकल्प असलेल्या स्कूटर प्रकल्पाने सप्टेंबरमध्ये सर्वोच्च उत्पादनक्षमता गाठली, होंडाने दोन महिन्यांमध्ये सुरळीतपणे गाड्या पोहोचवून सणासुदीच्या काळातील मागणी पूर्ण केली. या नियोजनमुळे होंडाने विक्रमी कामगिरी केली आणि सणासुदीच्या दोन महिन्यांमध्ये आम्ही 10 लाखांहून अधिक आनंदी ग्राहक संपादित केले. सर्वात प्रेरणादायी म्हणजे, केवळ धनत्रयोदशीच्या एका दिवशी आम्ही 2.6 लाख नवे ग्राहक जोडले!”

कन्झमशन पद्धतीमध्ये झालेला दर्शवत, स्कूटरायझेशनमुळे केवळ शहरी बाजारांतच नाही, तर निम-शहरी आणि ग्रामीण भागांतही सणासुदीच्या काळातील मागणीमध्ये मोठी वाढ झाली. या सणासुदीच्या काळात, अॅक्टिवाने 7 लाखांहून अधिक युनिटची विक्री करून आघाडी घेतली, तर त्यानंतर नंबर भारतातील पहिल्या क्रमांकाच्या विक्रेत्या 125सीसी मोटरसायकल सीबी शाइनचा (2 लाखांहून अधिक विक्री) क्रमांक लागतो.

होंडाने एप्रिल-ऑक्टोबर 16 मध्ये मोडला विक्रम :
सणासुदीच्या काळात रिटेल विक्रीमध्ये केलेल्या नव्या विक्रमाविषयी, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे वरिष्ठ उपाध्यक्ष – सेल्स व मार्केटिंग, यादविंदर सिंग गुलेरिया यांनी सांगितले, “अगोदरपासून तयारी, आक्रमक मार्केटिंग,नवे अतिरिक्त जाळे आणि दूरवरच्या ठिकाणापर्यंत उत्पादनांच्या उपलब्धतेची खात्री, यामुळे सणासुदीच्या काळात होंडाच्या रिटेल विक्रीमध्ये तब्बल 25%, म्हणजे 12.5 लाख युनिटपर्यंत वाढ झाली. तसेच, होंडाने एप्रिल ते ऑक्टोबर 2016या काळात डिसपॅचमध्ये 21% वाढ साध्य केली असून, या क्षेत्रातील 12% वाढीपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे.”

होंडाने भारतात केवळ 7 महिन्यांच्या कालावधीत, सर्वात जलद 30 लाखांच्या (33,01,297 युनिट) विक्रीचा मैलाचा टप्पा साध्य केला. होंडा उत्पादनांसाठी मागणी वाढली असल्याने, होंडाच्या ऑटोमॅटिक स्कूटरच्या विक्रीने प्रथमच 20 लाखांचा टप्पा ओलांडला (21,01,168 युनिट, 26% वाढ). होंडाच्या मोटरसायकल विक्रीनेही केवळ 7 महिन्यांच्या अल्प कालावधीमध्ये, प्रथमच 10 लाखांचा मैलाचा टप्पा ओलांडला(10,42,301 युनिट्स, 12% वाढ)!

यामुळे, होंडा 2व्हीलर्सने आता सर्वाधिक बाजारहिस्सा मिळवला आहे (2% हिस्सा वाढवणारी आणि एकूण 26%बाजारहिस्सा नोंदवणारी एकमेव कंपनी) आणि या सणासुदीच्या काळात टू-व्हीलर क्षेत्रातील व्हॉल्युमच्या वाढीमध्ये आघाडी घेतली आहे (21% वाढ, या क्षेत्रातील 11% इतक्या वाढीच्या जवळजवळ दुप्पट)!

ऑक्टोबर 2016 मधील विक्री :
ऑक्टोबर 16 मध्ये, होंडाने एकूण 4,92,367 युनिटची विक्री केली आणि ऑक्टोबर 2015 मधील 4,31,865 युनिटच्या तुलनेत 9% वाढ नोंदवली. ऑक्टोबर 16 मध्ये, देशांतर्गत बाजारात, सलग चौथ्या महिन्यात ऑटोमॅटिक स्कूटर्सच्या विक्रीने 3 लाखांचा टप्पा ओलांडला (3,02,946 युनिट), तर मोटरसायकल विक्रीने 1,67,542 युनिटची विक्री केली. चालू आर्थिक वर्षात, पाचव्या महिन्यात निर्यातीनेही 20,000 चा टप्पा पार केला आणि निर्यात 21,879 युनिट इतकी झाली, तसेच त्यात 29% वाढ झाली.

Post Bottom Ad