दाऊद खडसे फोन प्रकरण - चौकशीच्या नावाने माझा मानसिक छळ सुरु आहे - मनीष भंगाले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2016

दाऊद खडसे फोन प्रकरण - चौकशीच्या नावाने माझा मानसिक छळ सुरु आहे - मनीष भंगाले

मुंबई / प्रतिनिधी 7 Nov 2016
दाऊद आणि एकनाथ खडसे प्रकरण उघड करणाऱ्या ह्याकार मनीष भंगाले याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस तपस करत नसल्याचा तसेच तपासाच्या नावाने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत भंगाले असा आरोप केला आहे. यावेळी भंगाले याच्यासोबत त्याच्या एडव्होकेट गीतांजली लोखंडे सोबत होत्या.

उच्च न्यायालयात जेव्हा याचिका दाखल केली गेली तेव्हा ५ नंबर दिले होते. त्यापैकी एक नंबर खडसे यांचा आहे इतर ४ नंबर कोणाचे आहेत याची चौकशी केली जात नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशा प्रमाणे मी पोलिसांना सहकार्य करत असताना सायबर क्राईम वाले मात्र त्यांच्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगून माझ्याकडूनच सर्व माहिती मिळवत आहेत. सायबार क्राईम वाले ज्या आदेशा नुसार चौकशी करत आहेत तो आदेश किंवा कोणतीही कागदपत्रे सायबर क्राईम वाल्यांकडे नाहीत असा आरोप भंगाले याने केला आहे. चौकशीच्या नावाने मला फोन करून आणि पोलीस ठाण्यात बोलावून तासंतास बसवून ठेवले जाते. माझ्याकडून जबाब नोंदवला जातो मात्र त्याची प्रत मात्र दिली जात नाही अश्या अनेक प्रकारे माझा मानसिक त्रास दिला जात असल्याचे भंगाले याने सांगितले.

माझ्या अशिलाने ५ वादग्रस्त नंबर शोधून पोलीसांकडे दिले आहेत. त्या फोन नंबरची चौकशी करण्याचे सोडून माझ्या अशिलाची चौकशी सुरु असल्याचे जाणवत आहे. माझ्या अशिलाने दिलेल्या ५ नंबरची सखोल चौकशी करण्याची मागणी करताना पोलीस या प्रकरणी का चौकशी करत नाही असा प्रश्न एडव्होकेट गीतांजली केला आहे. हे नंबर खडसे यांच्यापेक्षाही मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचे असण्याची शक्यता असल्याने या नंबरची चौकशी केली जात नसावी अशी शंका लोखंडे यांनी व्यक्त केली आहे. माझ्या अशिलालाच चौकशी साठी बोलावले जाते मात्र ज्या नंबरची चौकशी करण्याची गरज आहे त्याची मात्र चौकशी करण्यास टाळाताल केली जात असल्याने आम्ही तक्रारदार कि आरोपी असा प्रश्न पडला असल्याचे लोखंडे म्हणाल्या. पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा न नोंदवता चौकशी केली जात आहे आणि गुन्हा न नोंदवता एकनाथ खडसे यांना क्लीन चिट कशी दिली असा प्रश्न लोखंडे यांनी उपस्थित केला आहे.

Post Bottom Ad