2 हजाराच्या नोटामुळे दुप्पट काळे धन निर्माण होईल - डॉ भालचंद्र मुणगेकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2016

2 हजाराच्या नोटामुळे दुप्पट काळे धन निर्माण होईल - डॉ भालचंद्र मुणगेकर

1000 आणि 2 हजाराच्या नोटा बंद करा - श्वेतपत्रिका काढा
मुंबई / अजेयकुमार जाधव 15 Nov 2016
केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे जनतेचे हाल होत आहेत. सरकारने नियोजन न करता घेतलेला हा निर्णय असून सरकारने पुन्हा 1000 रुपयांच्या नोटा काढू नयेत. सरकारने नोटा बंद करून काय केले आणि पुढे काय करणार आहे याची माहिती लोकांना व्हावी यासाठी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी नियोजन आयोगाचे माजी सदस्य व माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना 1000 रुपयांच्या नोटामुळे जर काळे धन निर्माण होत असेल तर 2000 हजार रुपयांच्या नोटांमुळे दुप्पट काळे धन निर्माण होईल. यामुळे सरकारने 1000 व 2000 रुपयांच्या नोटा बंद कराव्यात. देशात 500 रुपयांवर नोटा नसाव्यात असे मुणगेकर यांनी म्हटले आहे. 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करताना जे नियोजन केले पाहिजे होते त्यात सरकार, अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँक पूर्णपणे अपयशी ठरल्याचे मुणगेकर यांनी सांगितले. जनधन योजनेमधून जी खाते उघडली आहेत या खात्यांचा वापर काळे धन जमा करण्यासाठी केला जाऊ शकतो अशी भीती मुणगेकर यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने नोटा बंद केल्यावर त्या जागी 100 रुपयांच्या नोटा जितक्या प्रमाणात काढायला हव्या होत्या तितक्या नोटा न काढल्याने आज लोकांचे हाल होत आहेत. प्रधानमंत्र्याच्या भावनीक आवाहनाची गरज नसून सरकारने लोकांचे हाल कमी करण्यासाठी कृती योजना जाहिर करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी मुणगेकर यांनी केली. 2000 च्या नव्या नोटामुळे व पुन्हा 1000 रुपयांच्या नव्याने नोटा काढण्यात येणार असल्याने नव्याने काळे धन निर्माण होणार नाही याची योजना सरकारकड़े नसल्याची टिका मुणगेकर यांनी यावेळी केली.

Post Bottom Ad