मुंबई / 9 Nov 2016
वॉल्वो कारस् ची बहुप्रतिक्षित लक्झरी सेडन - वॉल्वो एस 90 बाजारपेठेत दाखल झाली आहे. नवीन तंत्रज्ञान व वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या या कारने लक्झरी कार विभागात वॉल्वोला आघाडीचे स्थान मिळवून दिले आहे. असे वॉल्वो ऑटो इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर टॉम वॉन बॉन्सडॉर्फ यांनी सांगितले.कारमध्ये सुरक्षितता म्हणून लेन किपिंग एड, रन ऑफ रोड प्रोटेक्शन, इमर्जन्सी ब्रेक असिस्ट, सीटबेल्ट प्रीटे न्शनर्स, चाईल्ड बूस्टर कुशन, हाय स्ट्रेन्थ बोरोन स्टील, व्हिप्लॅश प्रोटेक्शन, साईट इम्पॅक्ट प्रोटेक्शन ची व्यवस्था आहे.
वैशिष्ट्ये1) शक्तिशाली - 190 एचपी, 400 एनएस टॉक
2) बॉवर्स अँन्ड विल्किन्स -19 स्पीकर 1400 वॅट
3) हेड्स - अप डिस्प्ले
4) नाप्पा लेदर सीट्स, हिटिंग व कुलिंगसाठी व्हेन्टीलेटेड फ्रन्ट सीट्स
5)3 ड्राईव्ह मोड्स असलेले फोर - सी चेस्सीस व मागील चाकांवर स्वतंत्र एअर- सस्पेन्शन
6) एक्स - शोरूम मुंबई (प्री -ऑक्ट्रॉय): 53.5 लाख भारतीय किंमत