तीन महिन्यात मुंबईत धावणार बेस्टच्या इलेक्ट्रिक मिडी बसेस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तीन महिन्यात मुंबईत धावणार बेस्टच्या इलेक्ट्रिक मिडी बसेस

Share This
मुंबई, (प्रतिनिधी): बेस्ट उपक्रमाकडून हरित पर्यावरण उद्धिष्ट साध्य करण्याकरिता बॅटरी प्रवर्तित इलेक्ट्रिक मिडी बिगर वातानुकूलित सहा बसेस खरेदी करण्याच्या प्रस्तावास आज बेस्ट समितीत मंजुरी देण्यात आली. भारतात प्रथमच अशा प्रकारच्या बसेस अवतरणार असून या बसेसमुळे ३० ते ४० टक्के प्रदुषण कमी होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चायना मेड असलेल्या इलेक्ट्रिक बसेसमध्ये नंबर एकवर असलेल्या कंपनीकडून या बसेस पुरविण्यात येणार असून एका बसची किंमत सुमारे दिड कोटी रुपये असणार असल्याचे सांगण्यात आले. भारत सरकारकडून पर्यायी ऊर्जा स्त्रोत आणि वाहनांमधील प्रदुषण कमी करण्याकरिता प्रयत्नांचा एक भाग म्हणून या इलेक्ट्रिक बससाठी केंद्र सरकारने दिलेल्या अनुदानातून या बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या अर्थसंल्पामध्ये १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. सदर रकमेचा वापर ३१ मार्च २०१७ पूर्वी केला तरच प्रस्तुत रक्कम बेस्टला अनुदान म्हणून मिळणार असल्याने या बसेसच्या खरेदी प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

या इलेक्ट्रिक मिडी बसेसच्या बॅटऱ्या चार्ज कारण्यासाठी बेस्ट आगारा मध्ये चार्ज करण्याची सोय असणार आहे. सध्या बेस्टमध्ये प्रायोगिक तत्वावर या बसेस चालविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सध्या या इलेक्ट्रिक बसेस युनायडेट किंगडम, नेदरलँड, मलेशिया, हाँग-काँग इत्यांदि सारख्या अन्य देशांमध्ये बीवायडी बनावटीची इलेक्ट्रिक वाहने या पूर्वीच प्रवर्तनामध्ये आहेत. भारतामध्ये त्यांनी राजकोट, मनाली, नवी दिल्ली, बेंगळूर इत्यादी राज्यांमध्ये इलेक्ट्रिक बस गाड्यांचे प्रात्यक्षिक केलेले आहे. पुढील तीन महिन्यात चाचणीसाठी या बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages