मुंबई / प्रतिनिधी
मुंबई शहराची दूसरी लाईफ लाइन असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या एसी बसेस कवडीमोल दरात भंगारात घालवण्याचा प्रस्ताव समिती सद्स्यानी रोखला आहे.
बेस्ट उपक्रमामध्ये एसी बसेस हा पांढरा हत्ती असल्याचे बोलले जाते. 280 एसी बसेस 7 वर्षापूर्वी बेस्टच्या सेवेत दाखल झाल्या. त्यापैकी आता फ़क्त 106 बसेस रस्त्यावर धावत आहेत. इतर सर्व बसेस डेपोमध्ये धुळ खात पडल्या आहेत. एसी बसेसमधून बेस्टला गेल्या 4-5 वर्षात 80 कोटी रुपये महसूल मिळाला असताना 400 कोटी रुपये खर्च झाला आहे. एसी बसेसमधून तोटा होत असल्यास एसी बसेस बंद कराव्यात अशी मागणी बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी केली.
एसी बसेस चालवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. एसी बसेस भंगारात काढण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. एसी बसेस इतर ठिकाणी चालवता येवू शकतात तसा विचार का केला जात नाही असा प्रश्न उपस्थित करत या बसेस भंगारात काढण्यामागे कोण आहे त्यांची नावे समिती समोर आणावी अशी मागणी केदार होंबाळकर यांनी केली. एसी बसेस इतर ठिकाणी सुरु असताना बेस्ट एसी बसेस चालवण्यात अपयशी का ठरली याचा विचार करण्याची गरज असल्याचे तसेच बेस्टचा मेंटनेंस विभाग सुधारावा असे शिवजी सिंग म्हणाले.
एसी बसेस चालवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका सर्वच सद्स्यानी बैठकीत ठेवला. बेस्टला एसी बसेस खरेदी करणारा कोणी तरी कंत्राटदार भेटला असावा म्हणून या बसेस भंगारात काढल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रशासनाने एसी बस लिलाव करायच्या त्याला प्रतिसाद न मिळाल्यास बसेस भंगारात काढाण्यास अनुमती द्यावी असा प्रस्ताव सादर केला होता. असा प्रस्ताव मंजूर न करता बसेस लिलावात काढण्यास समिती सदस्यानी अनुमती दर्शवली आहे.