पेंग्विन मृत्यू प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याचे लोकायुक्तांचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 November 2016

पेंग्विन मृत्यू प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याचे लोकायुक्तांचे आदेश

मुंबई ( प्रतिनिधी ) - भायखळा येथील राणी बागेतील पेंग्विन मृत्यू प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश लोकायुक्तानी महापालिकेच्या प्राणी संग्रहालयाला दिले आहेत.


राणी बागेतील पेंग्विन मृत्यू प्रकरणी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. तर पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. विरोधी पक्षनेते छेडा यांनी पेंग्विन आणण्यापासून ते पेंग्विनच्या देखभालीपर्यंतच्या सर्वच कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, अनेक नियमांचे उल्लंघन झाले आहे तर पेंग्विनचा मृत्यू राणीबागेतील असुविधांमुळेच झाल्याचा आरोप छेडा यांनी लोकायुक्तांकड़े केलेल्या तक्रारीत केला आहे. या अनुषंगाने लोकायुक्त कार्यलायाने राणीबागचे उपअधीक्षक डाँ. संजय त्रिपाठी यांना समन्स बजावले आहे. याची आज सुनावनी झाली. 

या सुनावनी दरम्यान पेंग्विन मृत्यु प्रकरणी जबाबदारी निश्चीत करण्याचे आदेश दिले आहेत. स्वता लोकायुक्त पेंग्विन ज्या ठिकाणी ठेवले आहेत त्या जागेची पाहणी पुढील आठवड्यात करणार असून या प्रकरणाची पुढील सुनवाई 15 नोव्हेंबरला ठेवण्यात आल्याची माहिती प्रवीण छेडा यांनी दिली. तसेच पेंग्विनबाबत उलट सुलट बातम्या प्रसिद्धी माध्यमातून येत असल्याने दर आठवडयाला पेंग्विनबाबतची माहिती स्थायी समितीत सादर करावी अशी मागणी प्रवीण छेडा यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता व स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्याकड़े केली आहे.

Post Bottom Ad