दलित मतदारांवर केवळ बसपाचा अधिकार नाही - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दलित मतदारांवर केवळ बसपाचा अधिकार नाही - रामदास आठवले

Share This
उत्तर प्रदेश निवडणुकीत आरपीआय 200 जागा लढविणारअलाहाबाद दि 13 - उत्तर प्रदेशातील दलित मतदारांवर केवळ बहुजन समाज पक्षाचा अधिकार नाही देशातील दलित आदिवासी बहुजनांचे खरे प्रतिनिधित्व रिपब्लिकन पक्ष आणि अशोक चक्रांकित नीळा ध्वज करीत आहे उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत बसपाला धड़ा शिकविनार असल्याचा निर्धार करुन रिपब्लिकन पक्ष 200 जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले .
केंद्रीय मंत्रीमण्डळात रामदास आठवले यांची सामजिक न्याय राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल उत्तर प्रदेश च्या पूर्व विभागातील आरपीआय- ए च्या वतीने त्यांचा भव्य सत्कार अलाहाबाद येथील रामबाग मधील केपी कॉलेज मैदानात आज करण्यात आला. त्यावेळी झालेल्या सभेत नामदार रामदास आठवले बोलत होते . विचारमंचावर आरपीआय चे पूर्व विभाग उत्तर प्रदेशचे निरिक्षक आर आर मौर्या प्रदेशाध्यक्ष सत्यनारायण ;राहुलन आंबेडकर; जवाहर लाल आदि अनेक मान्यवर उपस्थित होते .

आगामी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याचा पर्याय खुला असुन युती झाली नाहीतर रिपब्लिकन पक्ष स्वाबळावर 200 जागा लढणार असुन अन्य जागांवर भाजप ला आरपीआय पाठिम्बा देणार आहे. अशी अधिकृत घोषणा आज नामदार रामदास आठवले यांनी केली .

उत्तर प्रदेशचा ईतिहास आरपीआयला अनुकूल राहिला आहे. बसपाचा उदय होण्या आधी उत्तर प्रदेशात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्षच दलितांचे प्रतिनिधित्व करीत होता. तोच वारसा उत्तर प्रदेशात आम्ही चालविणार आहोत असे सांगून बसपाला धड़ा शिकविणार असल्याचा निर्धार नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages