महापालिकांमध्ये तीन दिवसांत 465 कोटींचा करभरणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 November 2016

महापालिकांमध्ये तीन दिवसांत 465 कोटींचा करभरणा

मुंबई / प्रतिनिधी 13 Nov 2016
केंद्र सरकारने 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्या असल्या तरी वीज, पाणी, मालमत्ता करासह शासकीय देयकांसाठी जुन्या नोटांचा वापर करण्याची सवलत दिली होती. नागरिकांनी या सवलतीचा पुरेपूर लाभ घेतला असून, विविध महापालिकांमध्ये तीन दिवसांत 464 कोटी 68 लाख 83 हजार रुपयांचा करभरणा झाला आहे.

नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी रविवारी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सर्व महापालिका, नगरपालिका कार्यालये सुरू होती. सोमवारी, 14 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीची सुट्टी असली तरी सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत सर्व महापालिका व नगरपालिका कार्यालयांमध्ये कर स्वीकारण्याची सोय करण्यात आल्याचे नगरविकास विभागाकडून कळविण्यात आले आहे. जुन्या नोटांनी करभरणा करण्याची सुविधा देण्यात आल्याने गेल्या तीन दिवसांपासून दिवसभर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांच्या कार्यालयांत विविध करांचा भरणा करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे. आतापर्यंत 465 कोटी ५७ लाखांचा कर विविध महापालिकांच्या तिजोरीत जमा झाला आहे.

13 नोव्हें रोजी दुपारी 5.00 वाजेपर्यंत जमा रक्कम (रक्कम रुपये लाखात)
महानगरपालिकेचे नाव       रक्कम

बृहन्मुंबई महानगरपालिका 4726
नवी मुंबई महानगरपालिका 1708
कल्याण-डोबिंवली महानगरपालिका 2893.03
मीरा-भाईंदर महानगरपालिका 1838
वसई- विरार महानगरपालिका 844.03
उल्हासनगर महानगरपालिका 2233
पनवेल महानगरपालिका 179.16
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका 892
पुणे महानगरपालिका 7265
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 5449.51
ठाणे महानगरपालिका 1655
सांगली-कुपवाड महानगरपालिका 1023.66
कोल्हापूर महानगरपालिका 405
अहमदनगर महानगरपालिका 491
नाशिक महानगरपालिका 1432
धुळे महानगरपालिका 744.64
जळगांव महानगरपालिका 532
मालेगांव महानगरपालिका 433
सोलापूर महानगरपालिका 990
औरंगाबाद महानगरपालिका 494
नांदेड-वाघाळा महानगरपालिका 598
अकोला महानगरपालिका 203
अमरावती महानगरपालिका 496
नागपूर महानगरपालिका 990
परभणी महानगरपालिका 34.06
लातूर महानगरपालिका 349
चंद्रपूर महानगरपालिका 270.15
राज्यातील सर्व नगरपालिका
(नगरपालिका प्रशासन संचालनालय) 7300.59
एकूण जमा रक्कम (लाखात) 46468.83

१२ नोव्हेंबरपर्यंत महापालिकानिहाय जमा झालेली रक्कम (रक्कम रुपये कोटीत) 
मुंबई (४३ कोटी ७ लाख),
नवी मुंबई (१७ कोटी १६ लाख),
कल्याण-डोंबिवली (२२ कोटी ४४ लाख),
मीरा-भार्इंदर (११ कोटी ४९ लाख),
वसई- विरार (५ कोटी ९८ लाख),
उल्हासनगर (१७ कोटी ८ लाख),
पनवेल (१३ कोटी २ लाख),
भिवंडी-निजामपूर (७ कोटी ६९ लाख),
पुणे (४१ कोटी ६७ लाख),
पिंपरी-चिंचवड (१५ कोटी ८२ लाख),
ठाणे (१४ कोटी ५० लाख),
सांगली-कुपवाड (५ कोटी ९२ लाख),
कोल्हापूर (३ कोटी ४२ लाख),
अहमदनगर (४ कोटी ६ लाख),
नाशिक (११ कोटी ७ लाख),
धुळे (५ कोटी ४० लाख),
जळगाव (५ कोटी ७ लाख),
मालेगाव (३ कोटी ८५ लाख),
सोलापूर ( ९ कोटी ३५ लाख),
औरंगाबाद (४ कोटी ४२ लाख),
नांदेड-वाघाळा (५ कोटी १८ लाख),
अकोला (१ कोटी ६५ लाख),
अमरावती (४ कोटी ४६ लाख),
नागपूर (९ कोटी ९० लाख),
परभणी (२४ कोटी),
लातूर (३ कोटी १२ लाख),
चंद्रपूर (१ कोटी ४७ लाख)
राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये ६२ कोटी ९५ लाख
एकूण = ३३९ कोटी ५७ लाख

Post Bottom Ad