मुंबई ( प्रतिनिधी ) - पालिकेच्यावतीने जी /उत्तर विभागातील धारावी येथे ९६ इंच व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी व १५०० मी मी व्यासाची जलवाहिनी यांच्या जलजोडणीच्या कामासाठी ८ व ९ नोव्हेंबर रोजी दादर आणि बांद्रा परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
जी/उत्तर विभागातील धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग व दिलीप कदम मार्ग येथील सांयकाळचा पाणी पुरवठा तसेच एच पूर्व विभागातील वांद्रे टर्मिनस येथे ८ नोव्हेंबर रोजी तर जी/ उत्तर विभागातील प्रेमनगर,नाईकनगर, ६० फुटी रस्ता,जस्मिन मील मार्ग, ९० फुटी रस्ता, महात्मा गांधी मार्ग, धारावी लूप मार्ग, कुंभारवाडा येथे सकाळचा आणि एच पूर्व विभागात वांद्रे टर्मिनल आदी परिसरातील पाणी पुरवठा २४ तास बंद राहणार आहे