गजदरबंध पर्जन्यजल उदंचन केंद्राचे एप्रिल मध्ये कार्यान्वयन अपेक्षित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गजदरबंध पर्जन्यजल उदंचन केंद्राचे एप्रिल मध्ये कार्यान्वयन अपेक्षित

Share This
मुंबई / प्रतिनिधी
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पर्जन्यजल वाहिन्या खात्याची आढावा बैठक आज सकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) लक्ष्मण व्हटकर, प्रमुख लेखापाल ह. शं. निकम व संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकी दरम्यान पश्चिम उपनगरातील महापालिकेच्या 'एच/पश्चिम' व 'के/पश्चिम' या विभागाच्या कार्यक्षेत्रात पावसाळ्या दरम्यान साचू शकणा-या पाण्याचा त्वरीत निचरा व्हावा व संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही व्हावी; यादृष्टीने 'गजदरबंध' पातमुखावर पर्जन्यजल उदंचन केंद्र बांधण्यात येत आहे. याबाबतची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात असून येत्या एप्रिल २०१७ मध्ये हे पर्जन्यजल उदंचन केंद्र कार्यान्वित होणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

एप्रिल २०१७ च्या पहिल्या आठवड्यात गजदरबंध पर्जन्यजल उदंचन केंद्र कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही व तांत्रिक बाबी सुयोग्यप्रकारे पूर्ण कराव्यात, असे आदेश महापालिका आयुक्त यांनी आजच्या बैठकी दरम्यान दिले आहेत. विलेपार्ले, सांताक्रूज व खार या परिसरांचा पश्चिम भाग तर वांद्रे (प.) व सांताक्रूज (प.) परिसरातील काही भाग आदी परिसरांना गजदरबंध उदंचन केंद्रामुळे लाभ होणे अपेक्षित आहे. आजच्या बैठकी दरम्यान गजदरबंध उदंचन केंद्र बांधण्याची कार्यवाही करणा-या संबंधित कंत्राटदाराला बोलावून घेऊन त्यांच्याकडून कामाच्या सद्यस्थितीबाबतची माहिती देखील घेण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages