मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अचानक नोटा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा आहे. मोदींच्या निर्णयामुळे नेत्यांना त्रास नाही, सामान्य लोकांना त्रास होत आहे. रांगेत सर्व सामान्य माणसे दिसत आहेत. कुणी रांगेत भांडवलदार आहेत का? कुणी उद्योपती आहेत का? जनतेला तुम्ही विश्वासात घ्यायला हवे होते. अचानकपणे नोटा रद्द केल्याने सामान्य लोकांना त्रास होत आहे. जनतेने जर सर्जिकल स्ट्राईक केले, तर भारी पडेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
५०० आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नोटा बदलण्यासाठी मुदत वाढवायला हवी, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदींनी अचानक नोटा बदलून लोकांच्या विश्वासाची प्रतारणा केली, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “काळा पैसा बाहेर यायला हवा यात दुमत नाही. मात्र अचानक नोटा रद्द केल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. ५००-१००० रुपयांच्या नोटांवर सर्जिकल स्ट्राईक केला, मग स्वीस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक कधी ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नोटा बदलण्याला विरोध नाही, नागरिकांना होणारा त्रास थांबवा, नोटा बदलण्याची मुदत वाढवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नोटा रद्द केल्याने देशभरात एटीएम आणि बँकांसमोर सामान्य लोकांच्या रांगा लागल्या आहेत. नोटा बदलण्याच्या आधीच बँकांमध्ये नोटा उपलब्ध करायला हव्या होत्या. सामान्य जनतेला रस्त्यावर आणून देशाचे पंतप्रधान जपानला गेले. जनतेने विश्वासाने निवडून दिले आहे त्यांचा विश्वासघात करु नये, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेऊन जनतेच्या अडचणीत भर घातली असून आता जनताच सर्जिकल स्ट्राईक करेल अशी तीव्र टीका शिवसेनेचे पक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी अनेक मुद्यांना हात घालत केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर तिखट शब्दात टीका केली.
अचानक नोटा रद्द करण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय चुकीचा आहे. नोटा उपलब्ध नसताना जनतेला वेठीस धरले जात असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या निर्णयामुळे काळा पैसे किती बाहेर येईल याबाबतही त्यांनी साशंकता व्यक्त केली. नोटा बदलण्यासाठीबँकेत रांगेत उभे असलेल्या जनतेत उद्योगपती, भांडवलदार किंवा राजकीय नेते दिसतात का ? मग कुणाचा काळा पैसे तुम्ही बाहेर काढत आहात, असा सवाल करत त्यांनी नोटा बदलण्याची मुदत वाढवायला हवी असे म्हटले आहे.
खऱ्या अर्थाने काळा पैसे बाहेर काढायचा असेल तर मोदी साहेबांनी परदेशातल्या स्विस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मुंबईमध्ये नोटा बदलण्यासाठी बँकेत रांगेत असलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला असल्याचा उल्लेख करत ठाकरे जनतेच्या प्रश्नाला हात घातला. या निर्णयामुळे सामान्य लोकांना त्रास होत आहे. मोदींकडून लोकांच्या विश्वासाशी प्रतारणा झालीअसून जनतेने जर सर्जिकल स्ट्राईक केले, तर भारी पडेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जनता हुकूमशाही खपवून घेणार नाही. सगळीकडे पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा गवगवा केला जात आहे. पण पाकिस्तानला त्याचा काही फरक पडला का ? सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानने २७ भारतीय जवानांना मारले आहे . याला जबाबदार कोण असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.
नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर केंद्र सरकार सामान्य नागरिकांच्या बँकेतील ठेवीवरही कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे , ही भूमिका केंद्राने घेता कामा नये असे ही त्यांनी यावेळी सांगितले. बँकेत आणि एटीएममध्ये नोटांची उपलब्धता नसताना हा निर्णय कसा घेतला. त्यामुळे सामान्य जनतेला आणेल अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सामान्य जनतेचे वेळापत्रक कोलमडले आहे, मात्र मोदी यांचे वेळापत्रक बदलले नाही. त्यांनी आपल्या वेळापत्रकानुसार जपान गाठले आहे, अशा प्रकारे पंप्रधान मोदी यांनी जनतेचा विश्वासघात करू नये अशी टीका ही ठाकरे यांनी केली आहे .
पत्रकार परिषदेतील मुद्दे -
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाडस अंगलटी येणार आहे
- रांगेत सर्व सामान्य माणसे दिसत आहेत.कुणी रांगेत भांडवलदार आहेत का?कुणी उद्योपती आहेत का? जनतेला तुम्ही विश्वासात घ्यायला हवे होते
- तातडीने यावर उपाय सुचवला पाहिजे पाहिजे
- एटीएम बंद का आहेत, आता नागरिकांना मुदत वाढ दिली पाहिजे, नाहीतर सर्व सामान्य जनता सर्जिकल स्ट्राईक करेल
- जनतेच्या वेळापत्रकात बदल घडला, पण मोदीजींच्या वेळापत्रकात बदल नाही घडला
- जनतेचा विश्वास वाया घालवू नका, आम्ही ही भ्रष्ट्राचाराच्या विरोधात आहोत
- सर्जिकल स्ट्राईक नंतर काय फरक पडला आहे, पाकिस्तानने आतापर्यंत आपले २७ जवान मारले आहेत
- हिम्मत असेल तर स्विस बँकेवर कारवाई करा
- जनतेच्या लॉकर वर कसली नजर ठेवताय
- जोपर्यंत नोटा उपलब्ध होत नाहीत, तो पर्यंत सर्व फ्री करणार का?