पेंग्विनच्या खरेदी करारनाम्यासाठी बोगस कागदपत्रे - प्रवीण छेडा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पेंग्विनच्या खरेदी करारनाम्यासाठी बोगस कागदपत्रे - प्रवीण छेडा

Share This
मुंबई : पेंग्विन खरेदीसाठी करारनामा करताना कंत्राटाराने बोगस कागदपत्र सादर केले असून त्यावर कंत्राटदाराने सही केली नसल्याचा खळबळजनक आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत केला. पालिका आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी बसवा अशीही मागणी छेडा यांनी केली. त्यांच्या या नव्या आरोपामुळे पेंग्विन प्रकरण अधिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

महापालिकेने २५ कोटी रूपये खर्च करून आठ हम्बोल्ट पेंग्विनची खरेदी करण्यात आली हेाती या पेंग्विनला भायखळा येथील राणीच्या बागेतील प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आले होते. त्यापैकी २३ ऑक्टोबरला एका पेंग्विनचा मृत्यू झाला होता. पेंग्विनच्या मृत्युचे प्रकरण विरोधकांनी चांगलंच लावून धरल्याने अनेक हा विषय सध्या गाजत आहे. शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत विरोधी पक्षनेता छेडा यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे हा विषय उपस्थित केला. बोगस कागदपत्र सादर केली करून त्यावर कंत्राटदाराने सहीच केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट करीत याबाबतच्या पुराव्याची कागदपत्रेच स्थायी समितीसमोर सादर केली. मात्र पेंग्विनचा विषय मागील सभेत झाला आहे असे सांगून स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे व सभागृहनेता तृष्णा विश्वासराव यांनी त्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला. सत्ताधा-यांच्या अंगलट येणारा विषय दाबला जातो. माझ्याकडे सदर प्रकरणाची खरी माहिती असून त्याचे कागदपत्र माझ्याकडे आहेत त्यामुळे बोलत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. याप्रकरणी आयुक्तांनी चौकशी बसवा अशी मागणी केली. स्थायी समिती अध्यक्ष फणसे यांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवला. पेंग्विन मृत्यूप्रकरणी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. तर पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली असून, लोकायुक्त कार्यालयाने राणीबागचे उपअधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांना समन्स बजावले आहे. सध्या लोकायुक्तांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच पेंग्विनची देखभाल करणा-या कंत्राटदाराची सुमारे १ कोटी ४० लाखाची अनामत रक्कम पालिकेने सील केली आहे. छेडांच्या नव्या आरोपामुळे पेंग्विन प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे .

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages