टाटा हाऊसच्या सुरक्षा रक्षकांकडून छायाचित्रकारांना मारहाण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टाटा हाऊसच्या सुरक्षा रक्षकांकडून छायाचित्रकारांना मारहाण

Share This
मुंबई, दि. 04 - टाटा हाऊस येथे सायरस मिस्त्रींच्या पत्रकार परिषदेचे क्षण कॅमे-यात टिपत असलेल्या छायाचित्रकारांना येथील सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास टाटा हाऊसची पत्रकार परिषद पार पडणार होती. या परिषदेला सायरस मिस्त्रींनी हजेरी लावणार असल्याने तेथे पत्रकारांसह छायाचित्रकारांनी हजेरी लावली. २ च्या ठोक्याला टाटा हाऊस येथे पोहचलेल्या मेस्त्रींचे फोटो घेण्यासाठी छायाचित्रकार पुढे सरसावले. याच दरम्यान येथील सुरक्षा रक्षकांना धक्काबुकी झाली. दहा मिनिटानंतर मिस्त्री आतमध्ये निघून गेले. मिस्त्री आतमध्ये जाताच १५ ते २० सुरक्षा बाहेर धडकले. त्यांनी धक्काबुकी केली याचा राग धरत छायाचित्रकारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये छायाचित्रकार अतुल कांबळे, एच एल सांजकुमार आणि अर्जीत सेन जखमी झाले आहेत. तिघांवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी कांबळे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुखलाल वर्पे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. शिवाय छायाचित्रकारांनी घेतलेले फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानुसार याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. यामध्ये मारहाण करणारे तिघा सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचेही समजते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages