भारतीय महिला संघ हॉकी चॅम्पियन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 November 2016

भारतीय महिला संघ हॉकी चॅम्पियन

सिंगापूर : दीपिका ठाकूरने शेवटच्या मिनिटांत नोंदविलेल्या गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने चीन संघाचा २-१ गोलने पराभव करून आशियाई चषकावर आपले नाव कोरले. भारताच्या या विजयात दीप ग्रेस एक्का हिने १३ व्या मिनिटाला आणि दीपिकाने ६0 व्या मिनिटाला केले. चीनकडून एकमेव गोल झोंग मेंगलीगने ४४ व्या मिनिटाला केला. भारतीय पुरुष संघाने ३0 आॅक्टोबरला मलेशियातील कुआंटन येथे झालेल्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला होता.

भारतीय महिला संघाने पहिल्यांदा हा चषक आपल्या नावांवर केला आहे. भारतीय संघ २0१३ साली जपानकडून हरल्यामुळे उपविजेता राहिला होती. २0१0 च्या पहिल्या स्पर्धेत भारताला तिसरे स्थान मिळाले होते. विशेष म्हणजे भारताला लीग सामन्यात गेल्या शुक्रवारी चीनकडून २-३ असे पराभूत व्हावे लागले होते. गुण तक्त्यात चीन ९ गुणांसह पहिल्या तर सात गुणांसह भारत दुसऱ्या स्थानावर होता.अंतिम सामन्यात मात्र भारताने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करीत भारतीय हॉकीप्रेमींना दुहेरी आनंदाची संधी दिली. दीपिकाने शेवटचा हुटर वाजण्यास २0 सेकंद बाकी असताना पेनाल्टी कॉर्नरच्या रिबाउंडवर विजेच्या चपळाईने विजयी गोल डागला. तिच्या या कामगिरीने भारतीय संघाने जल्लोष केला, तर चीनी खेळाडू अवाक होउन पहात राहिले. तत्पूर्वी, दीप ग्रेस एक्काने पहिल्या क्वार्टरमध्ये १३ व्या मिनिटाला गोल नोंदवून भारताला आघाडी मिळवून दिली. अर्ध्या वेळेपर्यंत ही आघाडी कायम होती. तिसरा क्वार्टर संपण्यास एक मिनिट बाकी असताना झोंग मेंगलिगने गोल नोंदवून चीनला बरोबरी साधून दिली.

Post Bottom Ad