अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देऊ - सुप्रिया सुळे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देऊ - सुप्रिया सुळे

Share This
मुंबई / प्रतिनिधी 
अल्पसंख्यांक समाजातील लोकांना बँकांमधून कर्ज मिळत नाही. यासाठी रिझर्व्ह बँक व केंद्र सरकारने दखल घ्यावी म्हणून आपण प्रयत्न करून अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. कोंकण मर्कंटाईल बँकेच्या रुपये डेबीड कार्डच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कोंकणात प्रसिद्ध असलेल्या कोंकण बँकेने आपले रुपये डेबीड कार्ड शनिवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात लोकार्पण केले. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, बँकेचे अध्यक्ष नजीमुल्ला, उपाध्यक्ष बशीर मुर्तझा, शकील काझी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना यशवंतराव चव्हाण यांनी सहकार चळवळ सुरु केली. अनेक मान्यवरांमुळे हि चळवळ सर्वत्र पोहचली आहे. सहकार चळवळ महत्वपूर्ण आहे. आज खाजगी आणि मोठ्या बँकांमध्ये कर्ज घेण्यास लोक जाताना भीत असल्याने त्यांना सहकारी बँका आपल्या वाटत आहेत. यामुळे सहकारी बँका जगल्या पाहिजेत असे सुळे म्हणाल्या. आज समाजात मोठे बदल होत आहेत. आता कोणीही अल्पसंख्यांक, बहुसंख्य राहिलेले नाही. त्यामुळे आपण अल्पसंख्यांक आहोत असे ना समजता अल्पसंख्यांक हि भावना आपल्या मनातून काढून टाकावी तसेच महिलांना प्राधान्य देण्यासाठी पुणे सहकारी बँके प्रमाणेच महिलांना शून्य टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करून द्यावे असे आवाहन सुळे यांनी केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages