मराठी आणि हिंदी निम्नस्तर आणि उच्चस्तर परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2016

मराठी आणि हिंदी निम्नस्तर आणि उच्चस्तर परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या अमराठी भाषिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा दि. 15 जानेवारी 2017 रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहेत. तसेच अमराठी भाषिक राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी एतदर्थ मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा दि. 05 फेब्रुवारी 2017 रोजी पुणे केंद्रावर घेण्यात येणार आहे. याबरोबरच एतदर्थ मंडळामार्फत हिंदी भाषा निम्नश्रेणी व उच्चश्रेणी परीक्षा दि. 29 जानेवारी, 2017 रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहेत. 
मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आपली आवेदनपत्रे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत संबंधित विभागीय कार्यालयांकडे दि. 09 डिसेंबर, 2016 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तसेच एतदर्थ मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या पुढील मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आपली आवेदपत्रे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत दि. 30 डिसेंबर, 2016 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. एतदर्थ मंडळामार्फत हिंदी भाषा निम्नश्रेणी व उच्चश्रेणी परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आपली आवेदनपत्रे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत संबंधित विभागीय कार्यालयाकडे दि. 20 डिसेंबर, 2016 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

मराठी आणि हिंदी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षेसाठी विभागीय कार्यालय तसेच भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, डॉ.आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय इमारत, वांद्रे (पूर्व), मुंबई-400 051. दूरध्वनी क्र.26552184, 26417265 येथे अर्ज करता येईल. मुंबई व कोकण विभागातील अर्ज विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, कोकण भवन, 3 रा मजला, नवी मुंबई-400614, दूरध्वनी क्र.022-27573542 येथे पाठविता येतील. पुणे व नाशिक विभागात राहणाऱ्यांना या परीक्षेसाठीचे अर्ज विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, 2 रा मजला, पुणे-411001, दूरध्वनी क्र. 020-26121709 येथे करता येईल. तर नागपूर व अमरावती विभागात राहणारे विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001, दूरध्वनी क्र. 0712-2564956 येथे तर औरंगाबाद विभागासाठी विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद-431001, दूरध्वनी क्र. 0240-2361372 येथे अर्ज करता येतील.

परीक्षेसंबंधात अधिक माहिती आवश्यक असल्यास उपरोक्त संबंधित विभागीय सहायक भाषा संचालक यांच्याशी किंवा भाषा संचालक यांच्याशी दूरध्वनी क्र. 26552184 वर संपर्क साधावा असे आवाहन भाषा संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे केले आहे.

Post Bottom Ad