मुंबई ( प्रतिनिधी ) 16 Nov 2016 – मुंबई मधील जवळपास सर्वच वॉर्डातून गायब झालेले कच-याचे डबे येत्या काही दिवसांत वितरीत करण्याचा निर्णय़ प्रशासनाने घेतला आहे. पालिका निवडणूक अडीच महिन्यावर येऊन ठेपली असताही डबे उपलब्ध न झाल्याने मंगळवारी स्थायी समितीत नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी महापौर निधीतून लवकरच डब्यांचे वितरण केले जाईल असे आश्वासन दिले.

महिनाभरापूर्वी झालेल्या स्थायी समितीत शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगांवकर यांनी याबाबत प्रशासनाच्या निषेधार्थ सभा तहकूबी मांडला होता. त्याला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा देत प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर सर्व वॉर्डात10 लाख कच-याचे डबे टप्प्या-टप्प्य़ाने वितरण करण्याबाबत प्रशासनाने आश्वासन दिले होते. मात्र पालिका निवडणुका जवळ आल्या तरी प्रशासनाच्या याबाबत काहीही हालचाली नसल्याने यावर मंगळवारी शिवसेनेच्या युगंधरा साळेकर यांनी यावर हरकतीचा मुद्दा मांडून प्रशासनाला जाब विचारला. महिनाभरानंतर हाच विषय पुन्हा मांडावा लागल्य़ाने सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. सध्या बहुतांशी वॉर्डात सुका -आोला कचरा टाकण्यासाठी कच-याचे डबेच नसल्याने रहिवाशांना कचरा टाकण्यास अडचणी येत आहेत. पालिका निवडणूक अडीच महिन्यांवर येऊन ठेपली असतानाही कच-याचे डबे मिळत नसल्याने लोकांना उत्तर काय द्यायचे असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. काहींचा निधी मंजूर झाला असताना डबे वितरण करण्यास प्रशासनाची हलगर्जी का? असा सवाल नगरसेवकांनी विचारला. पालिका आचारसंहितेपूर्वी डबे मिळणार आहेत का? कधी मिळणार याबाबत प्रशासनाने आजच्या बैठकीतच सांगावे अशी मागणी लावून धरल्यानंतर महापौर निधीतून लवकरच डबे वितरित केली जातील त्याबाबतच्या सूचना आजच अर्थ विभागाला दिल्या जातील असे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्थायी समितीत सांगितले.