Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पंजाबमध्ये भाजप अकालीदल आणि आरपीआय महायुतीचा प्रस्ताव -- केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

अमृतसर दि 7 - पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अकाली दलाशी रिपब्लिकन पक्ष युती करुन महायुती करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र युती झाली नाहीतर पंजाबच्या 117 जागांपैकी आरपीआय स्वबळावर 35 जागा लढवेल अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी आज अमृतसर येथे केली

रिपब्लिकन पक्षाच्या पंजाब प्रदेश च्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदी नामदार रामदास आठवले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी नामदार आठवले बोलत होते विचारमंचावर रिपाइंचे पंजाब युवक आघाडीचे अध्यक्ष संदीप घई उत्तर भारत रिपाइंच्या अध्यक्षा मंजू छीबेर विजय देशावर आदि अनेक मान्यवर उपस्थित होते

पंजाबमध्ये मागील 10 वर्षापासून भाजप अकाली दल यूति आहे आता येथे आर पी आय चा ही युती चा प्रस्ताव आहे आर पी आय ला दोन्ही पक्षांनी येथे 5 जागा सोडल्यास जरूर भाजप आणि अकाली दलाशी युती करणार मात्र जागा सोडल्या नाहीतर 35 जागा स्वबळावर लाढन्याची तय्यारी असल्याचे नामदार रामदास आठवले यावेळी म्हणाले 

पंजाब च्या गावागावत आरपीआय चे संघटन वाढवून जनतेच्या प्रश्नावर काम करा पंजाब चे विविध प्रश्न सोडविन्यासाठी केंद्रसरकार आपल्या पाठीशी आहे प्रधानमन्त्री नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत असे सांगून पाकिस्तान सीमावर्ती गावांत हल्ले गोळीबार करीत असल्याचा तीव्र निषेध यावेळी नामदार रामदास आठवले यांनी केला

Top Post Ad

Below Post Ad

Voter Information & Services

Ads Bottom