मुंबई, दि. 10 : केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या संस्था तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांची देणी यामध्ये जनतेकडून पाणी, वीज,मालमत्ता कर यासह इतर शासकीय देयकांचा भरणा करताना 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या चलनी नोटा 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्याची परवानगी देण्याची विनंती राज्याने केंद्र शासनाकडे केली होती. ही विनंती केंद्र शासनाने मान्य केली असून त्यानुसार 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत महावितरणसह सर्व संबंधित कार्यालये मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याबाबतचा शासन आदेश तत्काळ निर्गमीतही करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून या संदर्भात विनंती केली होती. नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती तसेच राज्य शासनाच्या मालकीची मंडळे, महामंडळे यांची कर्जे तसेच विविध कर यांचा भरणा करण्यासाठी जुन्या रद्द करण्यात आलेल्या चलनी नोटा स्वीकारण्याची परवानगी दिल्यास नागरिकांची मोठी सोय होणार आहे. हे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणले होते, त्यानुसार केंद्र शासनाने तात्काळ निर्णय घेऊन अशी मुभा दिली आहे. केंद्राने परवानगी दिल्याप्रमाणे ज्यांच्या नावे ही देणी आहेत, त्यांना रुपये 500 आणि 1000 च्या रद्द करण्यात आलेल्या चलनी नोटा भरता येईल. शिवाय त्रयस्थ व्यक्तीही अधिकारपत्रे घेऊन कर्जदाराच्या नावे रक्कम चुकती करु शकतील.
याशिवाय, काल केंद्र शासनाने एका अधिसूचनेद्वारे जुन्या रद्द करण्यात आलेल्या चलनी नोटा विविध कारणांसाठीही स्वीकारल्या जातील, असेही जाहीर केले आहे त्यात घरगुती गॅस सिलेंडर, रेल्वेप्रवासात खाद्यपदार्थांची खरेदी, उपनगरी आणि मेट्रो रेल्वे सेवेच्या तिकिटांची खरेदी तसेच पुरातत्व विभागाच्या स्मारकांच्या प्रवेश शुल्काचा समावेश आहे.
वाहतूकदारांना अडचणी येऊ नयेत यासाठी महाराष्ट्रातील सर्व राज्यमार्गांवरील टोल टॅक्स (पथकर) 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत माफ करण्याचा निर्णय कालच (दि.9) घेण्यात आला होता. त्यात मुंबईत येणारे एन्ट्री पॉईंट्स आणि मुंबई शहरातील टोलनाक्यांचा सुद्धा समावेश आहे. मुंबई मेट्रोला 500 आणि 1000 रूपयांचे चलन स्वीकारण्याचे आदेशही कालच देण्यात आले होते. त्याप्रमाणे आता कार्यवाही देखील सुरू आहे. संबंधित निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शासकीय बिलांचा भरणा जुन्या नोटांद्वारे करण्यासंदर्भात निर्णय घेऊन जनतेस दिलासा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे आता चलनाच्या समस्येमुळे सामान्यांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही.
बँक आणि पोस्टामध्ये 500 व 1000 रुपयांच्या चलनी नोटा स्वीकारण्याची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि गृहिणींच्या पैशाला कोणतीही बाधा येणार नाही. कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित राहणार असून त्यामुळे जनतेने गोंधळून जाऊ नये, तसेच गर्दी करू नये. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आपण सर्वांनी मिळून स्वागत करुया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.