मुंबई भाजपाची नवी कार्यकारणी जाहीर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई भाजपाची नवी कार्यकारणी जाहीर

Share This
मुंबई, दि. 13
मुंबई भाजपाची नवी कार्यकारणी आज मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी जाहीर केली असून यामध्‍ये सर्वांना न्‍याय देण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याचे त्‍यांनी म्हटले आहे.
सबका साथ सबका विकास हाच भाजपाचा नारा असून त्‍याच दुष्‍टीने भाजपा काम करीत आहे. मुंबईच्‍या नव्‍या कार्यकारणीमध्‍ये अशाच प्रकारे सर्वांना न्‍याय देण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला असून सर्व समाज घटकापर्यंत आणि अंत्‍योदय पर्यंत सरकारच्‍या योजना पोहचव्‍ण्‍यासाठी ही नवी टीम जोमाने कामाला लागेल असा विश्‍वास यावेळी आमदार अॅड आशिष शेलार यांनी व्‍यक्‍त केला आहे.

नव्या टीममध्‍ये युवा मोर्चाच्‍या अध्‍यक्षपदी मोहित कंबोज यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून महिला मोर्चाच्‍या अध्‍यक्षपदी पुन्‍हा शलाका साळवी यांनाच संधी देण्‍यात आली आहे. तर उत्‍तर भारतीय मोर्चाच्‍या अध्‍यक्षपदी संतोष पांडे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
नव्‍या टीममध्‍ये उपाध्‍यक्ष म्‍हणून विनायक कामत, अॅड. दिनानाथ तिवारी, हैदर आझम, किरीट भंसाली, संतोष सिंह,आमदार अॅड पराग अळवणी, भालचंद्र शिरसाट, श्रिनिवास त्रिपाटी, अभिजित सामंत, अॅड. जे. पी. मिश्रा, विठ्ठल खरटमोल, दिलीप पटेल, संजीव पटेल, मिहिर कोटेजा, महेश कारीया, अमरजित सिंह, विजय गोवळकर, मिलिंद तुळसकर, भाऊ पार्ले, प्रसाद भिडे, आर. यू. सिंह, विजया निकलणकर, आणि मनोज दुबे यांचा समावेश आहे.

तर मुंबई संघटन मंत्री सुनिल कर्जतकर असून सरचिटणीस पदी सुमंत घैसास, आमदार योगेश सागर, सुनिल राणे आणि अमरजित मिश्रा यांचा समावेश आहे.तर चिटणीस पदी रश्‍मी मिरचंदानी, जगदिश पटेल, अजित मन्‍याल, शरद शहा पेटीवाला, मुरूगन, समिर देसाई, विनोद मिश्रा, अॅड. कमलाकर दळवी, अशोक कांबळे, प्रेमाशंकर पांडे, नील सोमय्या, नितीन बनकर, सुनिता यादव, आर. डी. यादव,भवरलाल कोठारी, राजेश सिंह, अॅड. अमित मेहता, अॅड. हितेश जैन, कुशल जैन, धर्मेश गिरी यांचा समावेश आहे.

तर कोषाध्‍यक्षपदी अरविंद देसाई, तर सह कोषाध्‍यक्ष पदी सुरेशभाई अग्रवाल यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. मुंबई महापालिका गटेनेते पदी मनोज कोटक यांनाच पुन्‍हा संधी देण्‍यात आली असून अध्‍यक्षांचे राजकीय सल्‍लागार पदी डॉ. पा. रा. किनरे यांची फेरनियुक्‍ती करण्‍यात आली आहे. तर मुख्‍य प्रवक्‍ते पदी संजू वर्मा यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून योगेश वर्मा, आरती साठे, राहूल तिवारी, निरंजन शेट्टी आणि संजय सिंह ठाकूर यांची प्रवक्‍ते पदी नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages