म्हाडाकडे १६ नोव्हेंबरपर्यंत तीन कोटी एक्क्यांशी लाख रुपये थकबाकी जमा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडाकडे १६ नोव्हेंबरपर्यंत तीन कोटी एक्क्यांशी लाख रुपये थकबाकी जमा

Share This
५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत थकबाकी जमा करण्यासाठी वापरता येणार 
मुंबई, दि. १८ नोव्हेंबर २०१६ : 
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ व मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळांच्या अखत्यारीत असलेल्या वसाहतींमधील संस्था, सदनिका, भूखंडांची थकबाकी वसुली अंतर्गत दि. १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान तीन कोटी एक्क्यांशी लाख रुपये थकबाकी जमा झाली आहे. शासनातर्फे जुन्या नोटांव्दारे थकबाकी वसुलीकरिता दि. २४ नोव्हेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांव्दारे थकबाकी वसुल करण्याकरिता महाराष्ट् शासनाच्या गृहनिर्माण विभागास प्राप्त आदेशानूसार म्हाडाच्या मुंबई मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, कोंकण मंडळ , पुणे मंडळ, नागपुर मंडळ, अमरावती मंडळ, औरगांबाद मंडळांच्या अखत्यारीत असलेल्या भाडेकरु - रहिवाशांकडून सेवाकर, विद्युत कर, पाणीकर, मालमत्ता कर आदींची थकबाकीचा भरणा दि. २४ नोव्हेंबर २०१६ पर्यंत करता येणार आहे.

या सेवेचा लाभ घेण्याकरीता आपल्याकडील आधार कार्ड, निवडणुक ओळखपत्र, वाहनचालक परवाना , पारपत्र अथवा कोणत्याही एका ओळखपत्राची छायांकित आणि साक्षांकित प्रत सोबत आणण्याचे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आले आहे . महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागास प्राप्त् झालेल्या आदेशानूसार स्थानिक संस्थाच्या विविध करांचा / देय रकमांचा भरणा करण्यासाठी वित्त विभागाच्या सूचना विचारात घेऊन अटी व शर्तीच्या अधीन राहुन हा निर्णय घेण्यात आला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages