मुंबई दि 18 Nov 2016 -
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उच्च मूल्याच्या नोटा बंदी चा घेतलेला निर्णय देशहिताचा ऐतिहासिक आणि स्वागतार्ह निर्णय आहे या निर्णयाविरुद्ध संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडण्याचे विरोधीपक्षांचे कृत्य निंदनीय आहे संसदेचे कामकाज रोखून विरोधक जनतेचा पैसे व्यर्थ बरबाद करीत आहेत अशी विरोधी पक्षांवर टीका करीत काळ्या पैशावर आणि नकली नोटांच्या राष्ट्रविरोधी धंद्यांवर जबर प्रहार करणाऱ्या नोट बंदी निर्णयाचे सर्वांनी स्वागतच करायला पाहिजे या निर्णयाने सामान्य माणसाच्या जीवनाची घडी सुव्यवस्थित होणार असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे एक हजार आणि पाचशे च्या नोटा बंदी निर्णयामुळे देशांतर्गत असलेला काळा पैसा आणि नकली नोटांची समस्या सुटणार आहे बँकांमध्ये शिल्लक जमा झाली आहे देशाच्या विकासासाठी हा निर्णय आवश्यक होता हा निर्णय कोणत्याही पक्षांविरुद्ध नाही सामान्य जनतेच्या हिताचाच हा निर्णय आहे नोटा बंदी मुळे थोडा काळ बँक व्यवहारात गैरसोय आणि रांगा लावाव्या लागल्या असल्या तरी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत नोट बंदी विरुद्ध कुणी गैरसमज करू नये रुग्णालय शाळा आदी ठिकाणी जुन्या नोट स्वीकारण्याचे तसेच टोलमाफ करण्याचे उपाय योजले आहेत बँकांमध्ये नोटा बदलण्याची मुदत वाढविली आहे आता बँकांमधील रांगा कमी होत आहेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात सरकार यशस्वी झाले आहे नवे चलन छापून पुरेश्या प्रमाणात वायूवेगाने देशभर वितरित होत आहे अश्यावेळी विरोधकांनी सरकारला सहकार्य केले पाहीजे नोट बंदी चा निर्णय रद्द होणार नाही मात्र विरोधकांनी संसदेत चर्चा करुन त्याबाबतच्या सूचना करायला हव्यात संसदेचे कामकाज रोखू नये असे आवाहान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधी पक्षांना केले आहे