माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह महाराष्ट्र शासनाचे अधिकृत प्रवक्ता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2016

माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह महाराष्ट्र शासनाचे अधिकृत प्रवक्ता

मुंबई, दि. 16 Nov 2016  : महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना आणि महत्त्वपूर्ण घटना-घडामोडींच्या वेळी प्रसारमाध्यमांकडे अधिकृतपणे शासनाची बाजू मांडण्यासाठी सचिव आणि महासंचालक माहिती व जनसंपर्क यांना शासकीय प्रवक्ता म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज सामान्य प्रशासन विभागाने जारी केले असून या परिपत्रकानुसार सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह हे शासकीय प्रवक्ता म्हणून जबाबदारी सांभाळतील.

राज्य शासनाच्या विविध विभागांचे निर्णय, खुलासे आणि इतर अधिकृत शासकीय माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी सचिव आणि महासंचालक,माहिती व जनसंपर्क यांना महाराष्ट्र शासनाचे अधिकृत प्रवक्ता म्हणून घोषित करण्यात आले आहे. या शासकीय प्रवक्त्यांच्या वतीने वर्तमानपत्रे, दूरचित्रवाहिन्या किंवा अन्य प्रसारमाध्यमांना अधिकृत शासकीय माहिती, खुलासे दिले जाणार आहेत. प्रसारमाध्यमांना पाठविण्यासाठी विविध शासकीय विभागांनी त्यांच्याशी संबंधित माहिती या प्रवक्त्यांना उपलब्ध करुन देण्याचे निर्देश या परिपत्रकान्वये देण्यात आलेले आहेत. सध्या ब्रिजेश सिंह हे माहिती व जनसंपर्क सचिव या पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे महासंचालक (माहिती व जनसंपर्क) पदाचा देखील कार्यभार आहे. सिंह हे भारतीय पोलीस सेवेतील विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी असून ते महाराष्ट् राज्याच्या सायबर गुन्हे शाखेचे आणि महिला अत्याचार प्रतिबंधक कक्षाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Post Bottom Ad