आरएसएसच्या चारित्र्याचा पंचनामा करा - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आरएसएसच्या चारित्र्याचा पंचनामा करा - प्रकाश आंबेडकर

Share This
मनु विरुध्द संविधान अशी चर्चा व्हावी
मुंबई / प्रतिनिधी 18 Nov 2016 
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ कोणत्याही मुद्दयावर चर्चा करत नाही आणि त्यांना चचेर्ला बोलावले तर घाबरुन पळुन जातात असे संघाचे चारित्र्य असल्याचा दावा भारीपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. देशात आगामी निवडणुकामध्ये मनु विरुध्द संविधान अशी चर्चा जाली तर देशातील जनता कोणाबाजूने आहे हे सर्वांना कळेल म्हणुन अशा प्रकारची चर्चा ठेवण्यात यावी अशी मागणी आंबडेकर यांनी यावेळी केली.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे शुक्रवारी (18 नोव्हेंबर) राम पुनियानी लिखित "आंबेडकर अ‍ॅण्ड हिंदुत्त्व पॉलिटिक्स" या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलत होते. यावेळी डॉ. आंबेडकर विचारधारा विरुध्द संघ विचारधारा या विषयावर परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेएनयु विद्यार्थी संघटनेची शेहला रशीद शुरा, सुकन्ना, विद्या चव्हाण आणि विवेक कोरडे उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनादरम्यान उपस्थित वक्त्यांनी आपले मते मांडत आरएसएस शिक्षण आणि इतर क्षेत्राचे भगवेकरण करत आहे हे उपस्थिीतांना पटवून दिले. संघ हिंदुत्वाचा आधार घेऊन कशा प्रकारे ब्राह्मणांच्या संस्कृती देशावर लादत असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी संघाचा खरा चेहरा काय आहे याचे एक उदाहरण यावेळी दिले आणि त्यांची देशभक्ती कोणासाठी आहे हे त्यावरुन उपस्थितांना पटवून दिले. एकदा नेताजी भारताची सिमारेसा ओलांडुन आपल्या सैनिकांसह संघाच्या नागपुर मुख्याल्यात पोहोचले. इंग्रजांविरोधात लढण्यासाठी आम्हाला संघाची मदत हवी आणि त्यासाठी जोशी नावाच्या एका माणसाला आदेश द्यावे यासाठी त्यांनी मुख्याल्यात केशव हेडगेवार यांची सहा तास वाट पाहिली मात्र हेडगेवार नेताजी यांना भेटले नाही. नेताजी यांना इंग्रजांनी भारतात बंदी घातली होती. देशाला स्वतंत्र मिळावे यासाठी संघाकडुन मदत मिळावी यासाठी नेताजींनी संघाकडे मदतीची मागणी केली मात्र ती अप्रत्यक्षपणे नाकारण्यात आली. त्यामुळे संघाची राष्ट्रभक्ती कशासाठी आणि कोणासाठी आहे हे या भेटीवरुन स्पष्ट होत असल्याचे आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. "आंबेडकर अ‍ॅण्ड हिंदुत्त्व पॉलिटिक्स" हे पुस्तक संघाचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी मोठी मदत होईल अशी आशा उपस्थिीतांनी यावेळी व्यक्त केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages