भाजपने अगोदरच काळयाचे पांढरे केले -- प्रवीण छेडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 November 2016

भाजपने अगोदरच काळयाचे पांढरे केले -- प्रवीण छेडा

सुट्टे पैसे हवेत तर आम्ही देतो 
भाजप गटनेत्याचे पालिका सभागृहात वक्तव्य
मुंबई / प्रतिनिधी – ५०० आणि १००० रूपयांची नोट बंदीवरून सरकार टिकेचे लक्ष्य झाले असतानाच शुक्रवारी पालिका सभागृहात भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी तुम्हाला सुट्टे पैसे हवे असतील तर आमच्याकडून घ्या असे वक्तव्य केल्याने विरोधकांनी गदारोळ घातला. या गदारोळानंतर महासभा तहकूब करण्यात आली. भाजपकडे सुट्टे पैसे आले कुठून ? त्यांनी अगोदरच काळयाचे पांढरे केले ? असा सवाल पालिकेतील विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा यांनी सभा तहकुब् झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

बेळगाव महापालिकेतील महापौर व उपमहापौर यांच्या नामफलकाला काळे फासण्याचा प्रकार आणि कर्नाटक सरकारकडून मराठी माणसांवर भरण्यात आलेले खटले याच्या निषेधार्थ महापालकेतील सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी सभा तहकुबी मांडली हेाती. त्या तहकुबीवर भाषण सुरू असतानाच भाजपचे गटनेता मनोज कोटक यांनी " सुट्टे पैसे हवे असतील तर देतो " असे वक्तव्य केल्याने, हाच धागा पकडून विरोधकांनी गोंधळ घातला. भाजपकडे सुट्टे पैसे आले कुठून ? असा सवाल विरोधी पक्षनेता छेडा यांच्यासह विरोधी पक्षातील नगरसेवकांनी करीत महापौरांच्या आसनासमोर घोळका घातला. यावेळी " बीजेपी चोर है , अशी घेाषणाबाजी विरोधकांकडून देण्यात आली. तर "नरेंद्र मोदी झिंदाबाद " अशी घोषणाबाजी भाजपच्या नगरसेवकांकडून करण्यात आली. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. या गोंधळात बेळगावचा प्रश्न मात्र बाजूलाच राहिल्याचे चित्र होते. अखेर महापौरांनी सभा तहकूब केली. दरम्यान विरोधी पक्षनेता छेडा यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना व भाजपवर टीका केली. सुट्टे पैसे घेण्यासाठी सर्वसामान्य जनतेला ३ ते ४ तास रांगेत उभे राहावे लागते. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. मात्र त्यावर शिवसेना आणि भाजप एक शब्दही काढताना दिसत नाही. रांगेत तीन तास उभे राहणाऱ्या सर्वसामान्याच्या भावनाना हे वक्तव्य वेदनादायक आहे, असे छेडा म्हणाले. भाजपकडे सुट्टे पैसे आले कुठून? याचे स्पष्टीकरण भाजपने द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.

शिवसेनेची दुहेरी भूमिकाबेळगावात मराठी माणसावर अन्याय झाल्याने शिवसेनेने तहकुबी मांडली. त्याला काँग्रेसनेही समर्थन दिले. मात्र मुंबईत मराठी माणसावर अन्याय होत आहे. महापालिकेतील मराठी कामगारांना कामावरून कमी केले जाते त्यावर शिवसेना काहीच बोलत नाही. मराठी माणसाला शिववडापावच्या गाडया सुरू करून दिल्या मात्र त्या नियमित करण्यात शिवसेना अपयशी ठरली. मराठी माणसाबाबतची शिवसेनेची दुहेरी भूमिका असल्याचा आरोप छेडा यांनी केला.

Post Bottom Ad