परिवर्तन सभेद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत देणार परिवर्तनाची हाक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

परिवर्तन सभेद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत देणार परिवर्तनाची हाक

Share This
मुंबई : 19 नोव्हेंबर 2016
सेना भाजपची मुंबई महापालिकेतील सलग वीस वर्षांची भ्रष्ट सत्ता उलथवून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झाली असून पहिल्या परिवर्तन सभेद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मुंबईत सत्ता परिवर्तनाची हाक देणार आहेत. सध्या देशभरात नोटाबंदीच्या निर्णयाने वातावरण ढवळून निघाले असून या मुद्द्यावर मुंबईतील घाटकोपर येथे होणाऱ्या पहिल्या परिवर्तन सभेत ते काय बोलतात याकडे संपुर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत संपुर्ण ताकदीनिशी उतरण्याचे नियोजन करण्यात येत असून या नियोजनाचाच एक भाग म्हणून मुंबईत जिल्हानिहाय परिवर्तन सभांचे आयोजन करण्यात येत आहे. ईशान्य मुंबई आणि उत्तर-मध्य मुंबई या दोन जिल्ह्यांसाठीची पहिली परिवर्तन सभा रविवार दि २० नोव्हेंबर रोजी घाटकोपर पुर्वेच्या पंतनगर परिसरातील रेल्वे पोलीस परेड मैदानावर पार पडणार आहे. सायंकाळी ४ च्या सुमारास या सभेला सुरूवात होणार असून पवार या सभेला मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षआ. सुनिल तटकरे आणि विधानसभेतील गटनेते आ. जयंत पाटील आदी मान्यवरांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीतील पक्षाच्या प्रचाराची दिशा काय असेल हे या सभेद्वारे स्पष्ट होणार असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई विभागिय अध्यक्षसचिन अहिर यांनी केले आहे.

सध्या आंतराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या महत्वपुर्ण घडामोडी, त्यांचा भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेवर होत असलेले परिणाम, देशांतर्गत रोजगार निर्मितीत झालेली घट, नोटाबंदी आणि त्यामुळे सामान्य जनतेला होत असलेला त्रास अशा अनेक महत्वाच्या मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.पवार साहेब काय बोलणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages