मुंबई 29 Dec 2016 - ‘भारतीय व्यापार क्षेत्रातील अभिनव कल्पना’ यावर चर्चा करण्यासाठी जागतिक कीर्तीचे विशेषज्ञ व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावर मुंबईत एकत्र येणार आहेत. व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यू.आय.ई.एफ.) च्या 21 व्या सत्राचे आयोजन 6 व 7 जानेवारी 2017 रोजी हॉटेल ताज महाल पॅलेस येथे करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 7 जानेवारी 2017 रोजी या फोरममधील व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या व्हॉर्टन विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून 1996 पासून या फोरमचे आयोजन करण्यात येते. भारताच्या झपाट्याने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेवर या फोरममधील चर्चेवर भर असतो. जागतिक स्तरावर एक प्रमुख आर्थिक शक्ती म्हणून उदयाला येत असताना भारतासमोरील आव्हांनाबाबत चर्चा करण्याची संधी उद्योग क्षेत्रातील प्रमुख, व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी यांना या फोरमच्या निमित्ताने मिळते.
व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरम 2017 मध्ये चर्चेचा भर भारतीय व्यापार क्षेत्रातील अभिनव कल्पना या विषयावर असणार आहे. परिषदेतील व्याख्यानमालेत प्रमुख धोरणकर्ते,उद्योगक्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षणतज्ज्ञ आपले विचार व्यक्त करतील. नवउद्योजकांसाठी ‘स्टार्ट अप स्पर्धा’ यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्राला पोषक वातावरणासाठी संवाद वाढविणे आणि धोरणकर्ते, उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञ यांना एकत्र आणून सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमामागचा हेतू आहे.
यापूर्वी माजी राष्ट्रपती स्व. अब्दुल कलाम, एन. आर.नारायण मूर्ती, नंदन निलकेणी, दीपक पारेख, मुकेश अंबानी, राहुल बजाज, चंदा कोचर, किरण मुजुमदार शॉ यांच्यासह चित्रपट, क्रीडा या क्षेत्रातील नामांकित वक्त्यांनी परिषदेतील व्याख्यानमालेत सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी www.whartonindia.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.