पालिका सभागृहात प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्र - २ जानेवारीला अनावरण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका सभागृहात प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्र - २ जानेवारीला अनावरण

Share This
मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) – मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी युती किंवा आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. याचाच भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर करून सर्वांवर आघाडी घेतली आहे. मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्व् भूमीवर येत्या २ जानेवारी २०१७ रोजी पालिका सभागृहात प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम होत असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. 
पालिकेची सभागृह सभा केवळ प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्र लावण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी लावण्यात आली होती. सदर प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे २ जानेवारीला त्याचे अनावरण करणे शक्य होणार आहे. पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर तैलचित्र लावणे शिवसेनेला शक्य होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे उपस्थित राहणार असल्याने पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची नेमकी भूमिका काय असणार आहे याबाबत शंका उपस्थित होत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages