कुपरेज उद्यानातील बॅण्डस्टॅण्डचे होणार नूतनीकरण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुपरेज उद्यानातील बॅण्डस्टॅण्डचे होणार नूतनीकरण

Share This
मुंबई – मुंबईतील पुरातन वास्तु सेवात मोडणाऱया कुपरेज उद्यानातील बॅण्डस्टॅण्डच वास्तुचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या बॅण्डस्टॅण्डचे हेरिटेज लूक कायम राखून याचा जीर्णोध्दार करत कुपरेज उद्यानाच्या सुशोभिकरणावर भर दिला जाणार आहे.
पालिकेच्या 'ए' विभागातील बॅण्डस्टॅण्ड वास्तु ही फोर्ट पुरातन परिसीमामध्ये असून ती मुंबई पालिकेच्या मालकीची आहे. हे बॅण्डस्टॅण्ड पूर्णपणे सागवानी लाकडाचे आहे. त्यावरील जोत्याचे बांधकाम बेसॉल्ट दगडाचे आहे. बैठक व्यवस्था बीड धातुची आहे आणि वास्तुवर मंगलोरी कौलाचे छप्पर आहे. ही वास्तू पुर्णपणे जीर्ण तसेच खराब झाल्यामुळे याचे नुतनीकरण करुन त्याला गतवैभव प्राप्त करुन देण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश ) फणसे यांनी दिली आहे.अष्टकोनी कमानबध्द वास्तू असलेल्या या बॅण्डस्टॅण्डचे सागवनी लाकूड खराब झाले आहे. त्याचा पाया कमकुवत झाला आहे. त्यावर रंगरंगोटी केल्यामुळे त्याला विद्रुपता आली आहे. त्यामुळे मुंबईच्या सौंदर्यात वाढ करण्यासाठी या वास्तुचे संरक्षण तसेच जतन करण्यात येईल. यासाठी जीर्णोध्दार कॉन्झव्हॅटर्स या संस्थेची निवड करण्यात आली असल्याचीही माहिती यशोधर (शैलेश ) फणसे यांनी दिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages