नोटाबंदीसंदर्भात जिल्हा बँकांवरील निर्बंधाबाबत पंतप्रधानांना भेटण्याचे विधानपरिषदेचे सभापतींचे निर्देश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नोटाबंदीसंदर्भात जिल्हा बँकांवरील निर्बंधाबाबत पंतप्रधानांना भेटण्याचे विधानपरिषदेचे सभापतींचे निर्देश

Share This
नागपूर, दि. 5 : जिल्हा सहकारी बँकावर नोटाबंदीसंदर्भात घातलेले निर्बंध उठवण्याबाबत राज्याच्या शिष्टमंडळाने बँकांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री यांची भेट घेण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शासनाला दिले.

नोटाबंदीसंदर्भात नियम 298 अन्वये चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सदस्य जयंत पाटील यांनी केली. त्यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages