चैत्यभूमीवर अभिवादन करण्यापासून मुख्यमंत्र्यांना रोखू - सचिन खरात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चैत्यभूमीवर अभिवादन करण्यापासून मुख्यमंत्र्यांना रोखू - सचिन खरात

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव - 5 Dec 2016
चैत्यभूमीवर ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी येणा ऱ्या मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाला टीडीआर दिल्याचे जाहीर करावे व नंतर अभिवादन करावे. अन्यथा अभिवादन करण्यास आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चैत्यभूमीवर अभिवादन करण्यापासून रोखू असा इशारा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक इंदू मिलमध्ये करण्याची घोषणा केंद्र आणि राज्य सरकाराने केली आहे. मागील वर्षी घाईघाईत मिलची जमीन हस्तातंतरीत झाली नसतानाही स्मारकाचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. स्मारकाचे भूमिपूजन करून एक वर्ष गेले तरी अद्याप स्मारकासाठी लागणारी मिलची जमीन केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित केलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत केंद्र आणि राज्य सरकार वेळकाढू धोरण अवलंबत असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये सरकार विरोधात तीव्र असंतोष पसरला असल्याचे खरात यांनी सांगितले.

ज्या मुख्यमंत्र्यांना बाबासाहेबांच्या स्मारकासाठी लागणाऱ्या इंदू मिलच्या टिडीआरचा घोळ मिटवता येत नाही अश्या मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा कोणताही अधिकार नाही. पेशवाईच्या काळात जनतेला जेवणावळी घालून मिंदे करण्याचे प्रकार होत होते. आताही स्मारकाच्या विषयावरून लक्ष वळवण्यासाठी भाजपा सरकारकडून ६ डिसेंबरला जेवणावळी घालून आंबेडकरी जनतेला मिंदे बनवण्याचा प्रकार केला जात असल्याचे खरात यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages