बेस्टच्या महापरिनिर्वाणदिन निधीमध्ये वाढ करण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या महापरिनिर्वाणदिन निधीमध्ये वाढ करण्याची मागणी

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (6 डिसेंबर) बेस्ट कडून विविध सोयी सुविधा पुरवण्यात येतात. यासाठी मंजूर करण्यात आलेला फंड हा कमी पडत असल्याने या निधीमध्ये वाढ करावी अशी मागणी कॉंग्रेसचे बेस्ट समिती सदस्य संदेश कोंडविलकर बेस्ट समितीत ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्ट कडून 5 व 6 डिसेंबरला चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर, येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना प्रथमोपचार, वैद्यकीय मदत, नेत्र तपासणी, अल्पोपहार, चहा, पाणी इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सोयी सुविधा देण्यासाठी बेस्ट समितीच्या 8 ऑक्टोबर 2010 च्या बैठकीत 10 लाख इतका खर्च करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

2010 नंतर सातत्याने महागाई वाढत आहे. यामुळे जितक्या लोकांना सोयी सुविधा द्यायच्या आहेत त्या संखेत कमालीची घट झाली आहे. चहा बिस्किटच्या स्टॉलवर 30 हजार लोकाना चहा बिस्किटे दिली जायची आता ही संख्या 17 हजारावर आली आहे. अशीच परिस्थिती इतर सोयी सुविधाबाबत आहे. यामुळे जास्तीत जास्त लोकांना या सुविधांचा लाभ घेता यावा म्हणून 10 लाख असलेल्या या निधिमध्ये वाढ करून 25 लाख करावी अशी मागणी संदेश कोंडविलकर यांनी केली आहे. या आधीही संदेश कोंडविलकर यांनी समितीच्या बैठकीत वेळोवेळी निधी वाढवण्याची मागणी केली असली तरी प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याने समितीच्या बैठकीत ठरावाची सूचना मांडली आहे. सोमावारी (19 डिसेंबर) होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीत या ठरावाच्या सुचनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages