चांगल्या प्रकारे देखभाल करणाऱ्या संस्थाना दत्तक तत्वावर भूखंड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चांगल्या प्रकारे देखभाल करणाऱ्या संस्थाना दत्तक तत्वावर भूखंड

Share This
मुंबई 28 Dec 2016 - मुंबई महानगरपालिकेकडून दत्तक तत्वावर भूखंड घेऊन ज्या संस्थांनी व्यवस्थित परिरक्षित करून सुविधा दिल्या आहेत अशा चांगल्या संस्थांना दत्तक संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून ठरविण्यात आलेल्या विविध निकषाद्वारे काम करणाऱ्या संस्थांना सदर भूखंड ११ महिन्यांसाठी किंवा नवीन धोरणाला मान्यता मिळेपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला . सदर प्रस्ताव आज सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधर यांनी बहुमताने मंजूर केला .
सदर प्रस्तावावर बोलताना काँग्रेस चे ज्येष्ठ नगरसेवक मोहसीन हैदर यांनी पालिकेची हीच भूमिका होती तर त्यावेळी सदर प्रस्ताव का रोखण्यात आला असा सवाल करीत भूखंडांच्या दुरावस्थेला जबाबदार कोण हे स्पष्ट करण्याची मागणी केली . पालिकेकडून अनेक भूखंड व्यवस्तीथ विकसित करून त्याची योग्यप्रकारे देखभाल केली जात असताना अशाप्रकारे खाजगी संस्थांना भूखंड देणे चुकीचे असल्याचे मोहसीन हैदर म्हणाले , यावर शिवसेनेकडून राजू पेडणेकर यांनी सदर प्रस्ताव मंजूर करण्यास अनुमती दर्शविली , मात्र यापूर्वी सदर विषयाप्रकरणी भा ज प कडून शिवसेनेला बदनाम करण्याचे राजकारण का केले गेले त्यावेळी सदर विषय गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर झाल्यावरही भा ज प ने आपली विरोधी भूमिका मांडली होती .
या प्रस्तावावर उपयुक्त चंद्रशेखर चौरे यांनी हि पॉलिसी कायम नसून केवळ ११ महिन्यांसाठी असल्याचे स्पष्ट केले . सदर भूखंड देताना चांगले काम करणाऱ्या संस्थानांचा मान्यता देणार असल्याचे सांगितले . त्यानंतर नवीन धोरणानुसार निर्णय घेतला जाईल . त्यामुळे सध्या सदर धोरणाला मंजुरी द्यावी अशी विनंती त्यांनी केली , या स्पष्टीकरणानंतर अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी सदर प्रस्तावावर प्रशासनाने योग्य ती माहिती दिली असल्याचे सांगत संस्थांची निवड नेमण्यात येणाऱ्या बाजार उद्यान तसेच सुधार समिती अध्यक्षांचा समावेश करण्याच्या उपसूचनेसह सदर प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय घेतला .

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages