सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री

Share This
मुंबई दि.28 Dec 2016 : मुंबईतील सर्वसामान्यांचे जीवनात परिवर्तन आणण्यासाठी परवडणारी घरे, दळणवळण सक्षम करणे यासाठी शासन कार्य करीत आहे. या माध्यमातून सर्वसामान्याच्या पर्यायाने मुंबईच्या विकासाला गती देण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

घाटकोपर येथे विविध विकासकामांच्या भुमिपुजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, आमदार राम कदम, अतुल भातखळकर उपस्थित होते. यावेळी राजावाडी परिसरातील 400 लाभार्थ्यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत घरांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुंबईतील सर्वसामान्याला घराचा हक्क मिळवुन देण्यासाठी शासन 10 लाख परवडणारी घरे निर्माण करणार आहे. यासाठी मुंबई विकास आराखड्यात मोकळ्या होणाऱ्या जागा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच दळणवळण सक्षम करण्यासाठी लोकल सोबतच मेट्रो, मोनोचे जाळे निमार्ण करण्यात येत आहे. मेट्रोद्वारे येत्या 5 वर्षात 70 लाख प्रवासी क्षमता नर्माण होईल. त्याचप्रमाणे जलवाहतुकीला गती दिली जात आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages